27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अरबी समुद्राखालून 21 किमीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन; महाराष्ट्रात असतील इतकी स्थानक

- Advertisement -
- Advertisement -

Bullet Train in India: महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. अरबी समुद्राखालून जाणारा देशातील पहिला 21 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. त्यातून तब्बल ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.

21 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) यांचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान परदेशात वापरले जाते. मुंबईतील विक्रोळी आणि आसपासच्या घणसोली, शिळफाटा आणि या भागात मशिनरीद्वारे काम सुरू करण्यासाठी खोदकाम केले जाणार आहे. वर्षाअखेरीपर्यंत पहिल्या टनेल बोअरिंग मशीनद्वारे काम सुरू होण्याची शक्यता आहे.समुद्राखालून तयार करण्यात येणाऱ्या या बोगद्यातील 7 किमीच्या खोदकामात अनेक अडचणी येऊ शकतात. हा बोगदा सिंगल ट्यूब बोगदा असेल. त्यात बुलेट ट्रेनला येण्यासाठी आणि जाण्यासाठी असे दोन ट्रॅक असतील.वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान हा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन या 508 कि.मी. लांबीच्या कॉरीडॉरचे काम करत आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. हा बोगदा देशातील समुद्राखालचा पहिलाच बोगदा असणार आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल.असून बोगद्याचे खोदकाम तीन महाकाय मशीनच्या मदतीने करण्यात येत आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्थानके असणार आहे. तर, मुंबईहून अहमदाबाद अंतर गाठण्यासाठी 3 तासांचे वेळ लागणार आहे. 12 स्थानकांपैकी 4 स्थानके महाराष्ट्रात असतील व 8 स्थानके गुजरातमध्ये असतील. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स (BKC), ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. ऑगस्ट 2026पासून .

बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जवळपास 3681 कोटींचा खर्च येऊ शकतो. तर, या प्रकल्पासाठी 559 कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तर, या प्रकल्पासाठी 24 पुल नदीवर बांधण्यात येणार आहेत. त्यातील 20 पूल गुजरातमध्ये आणि 4 पूल महाराष्ट्रात आहेत. तर, बुलेट ट्रेन 320 किमी प्रति तास धावणार आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यानचे अंतर फक्त 127 मिनिटांत पूर्ण करणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!