सौ शिल्पा यतीन खोत यांनी मालवण मधील रस्ते सरळीत व्हावे यासाठी प्रशासनाकडे केली मागणी
मालवण |
मालवण शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत.नागरिक, वाहनचालक यांना होणारा त्रास लक्षात घेता तसेच आगामी गणेशोत्सव, सण उत्सव कालवधी पाहता रस्ते सुस्थितीत करावेत. खद्देमय रस्त्यातून नागरिकांची सुटका करावी. याबाबत तातडीने कारवाई व्हावी. अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सौं. शिल्पा यतीन खोत यांनी मालवण नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन माध्यमातून केली आहे. अधिकारी सोनाली हळदणकर यांना याबाबत निवेदन देत चर्चा करण्यात आली.
बांगीवाडा समाज मंदिर रोड, पांजारीवाडा (भरड) काँक्रिटीकरण आदी प्राधान्य क्रम ठेवून अन्य सर्व खड्डेमय रस्ते प्राधान्यक्रम ठरवून गणेशोत्सव पूर्वी सुस्थितीत करून घ्यावेत. अशी मागणी शिल्पा खोत यांनी केली आहे.
यावेळी नांदा सारंग, प्रतिभा चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, अश्विनी आचरेकर, साक्षी मयेकर, स्वाती तांडेल, मानसी घाडीगावकर, ज्योती तोडणकर, तन्वी भगत, दीपा पवार, प्रियांका लाड, निकिता केळूस्कर यांसह अन्य महिलां उपस्थित होत्या.