27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

विनेश फोगाट फायनलमध्ये, सेमी फायनल ५-० ने जिंकली, सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

- Advertisement -
- Advertisement -

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलमध्ये पोहोचली आहे. सेमी फायनलमध्ये विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. ५० किलो वजनी गटात तिने फायनलमध्ये प्रवेश केला. ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन (Yusneylys Guzman) हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

विनेशने आता किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. विनेशची फायनल बुधवारी (७ ऑगस्ट) होणार आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू आहे.

विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू बनण्याची सुवर्णसंधी आहे. उपांत्य फेरीत तिने क्युबाची प्रतिस्पर्धी कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझचा एकतर्फी 5-0 असा पराभव केला. विनेश प्रथमच ऑलिम्पिकमध्ये ५० किलो गटात खेळत आहे. यापूर्वी ती ५३ किलो गटात खेळायची. विनेशने ऑलिम्पिक वगळता प्रत्येक मोठ्या खेळात पदके मिळवली आहेत.

यामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण, एक आशियाई स्पर्धेतील विजेतेपद, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यांसह आशियाई चॅम्पियनशिपमधील ८ पदकांचा समावेश आहे. मात्र, तिला रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही.

२९ वर्षांची विनेश फोगटने गेल्या वर्षी मॅटपासून दूर बराच वेळ घालवला. विनेश फोगाट आणि आणि भारताचे माजी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग शरण यांच्यात बराच काळ वाद चालला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलमध्ये पोहोचली आहे. सेमी फायनलमध्ये विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. ५० किलो वजनी गटात तिने फायनलमध्ये प्रवेश केला. ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन (Yusneylys Guzman) हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

विनेशने आता किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. विनेशची फायनल बुधवारी (७ ऑगस्ट) होणार आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू आहे.

विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू बनण्याची सुवर्णसंधी आहे. उपांत्य फेरीत तिने क्युबाची प्रतिस्पर्धी कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझचा एकतर्फी 5-0 असा पराभव केला. विनेश प्रथमच ऑलिम्पिकमध्ये ५० किलो गटात खेळत आहे. यापूर्वी ती ५३ किलो गटात खेळायची. विनेशने ऑलिम्पिक वगळता प्रत्येक मोठ्या खेळात पदके मिळवली आहेत.

यामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण, एक आशियाई स्पर्धेतील विजेतेपद, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यांसह आशियाई चॅम्पियनशिपमधील ८ पदकांचा समावेश आहे. मात्र, तिला रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही.

२९ वर्षांची विनेश फोगटने गेल्या वर्षी मॅटपासून दूर बराच वेळ घालवला. विनेश फोगाट आणि आणि भारताचे माजी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग शरण यांच्यात बराच काळ वाद चालला.

error: Content is protected !!