गौतम अदाणी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्ती घेण्याची योजना आखली आहे. ज्या लोकांना उत्तराधिकारी बनवले जाणार आहे, त्या लोकांकडे आधीच अदाणी समूहाच्या विविध खात्यांची जबाबदारी आहे.
खरं तर, मुलाखतीत निवृत्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना, अदाणी म्हणाले की ते वयवर्ष ७० पर्यंत काम करतील आणि २०३० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे संपूर्ण काम कंपनीच्या नवीन मालकाकडे सोपवतील
गौतम अदाणी यांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल आणि उत्तराधिकारीबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्तीनंतर अदाणी समूहाची कमान आपल्या मुलांकडे आणि पुतण्यांकडे सोपवण्याचा त्यांचा विचार आहे.
गौतम अदाणी निवृत्त झाल्यावर, त्यांचे चार उत्तराधिकारी – मुले, करण व जीत आणि पुतणे, प्रणव आणि सागर हे फॅमिली ट्रस्टचे लाभार्थी होतील.
अदाणी समूहाच्या वेबसाइटनुसार, गौतम अदाणी यांचा मोठा मुलगा करण अदाणी, अदाणी पोर्ट्सचा व्यवस्थापकीय संचालक आहे, तर त्यांचा धाकटा मुलगा जीत अदाणी हा अदाणी एयरपोर्ट्सlचा संचालक आहे.
वेबसाइटनुसार, प्रणव अदाणी हे अदाणी एंटरप्रायझेसचे संचालक आहेत आणि सागर अदाणी हे अदाणी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक आहेत. प्रणव आणि करण हे अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.
अदाणी समूहाच्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचे तर, त्यात १० सूचीबद्ध कंपन्या आहेत, ज्यांचे एकूण मार्केट कॅपीटल सुमारे २१.३ हजार कोटी डॉलर आहे. समूहाचा व्यवसाय कोळसा व्यापार, खाणकाम, लॉजिस्टिक्स, वीज निर्मिती आणि वितरणाचा आहे. अदानी समूहाने सिमेंट उद्योगातही प्रवेश केला आहे.
(फोटो: एक्सप्रेस संग्रह)