बांदा :राकेश परब |
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून गणेश मूर्तिकारांना ७५ टक्के व्यावसायिक अनुदान किंवा कमाल 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान तसेच जिल्हा परिषद स्वनिधी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भजनी मंडळाना भजनी साहित्य पुरविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही मुदत १० ऑगस्ट असून बांदा शहरातील जास्तीत जास्त गणेश मूर्तिकार व भजनी मंडळानी अर्ज सादर करावेत व या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.
सिंधुरत्न समृद्धी योजनेतून गणेश मूर्तिकारांना अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून १० ऑगस्ट पर्यंत तालुकानिहाय प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच भाजनी मंडळासाठी स्वनिधीतून भजनी साहित्य संच पुरविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून २० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे. या लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.