29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

77व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने सिंधू रनर्सचा सावंतवाडीचा अनोखा उपक्रम !

- Advertisement -
- Advertisement -

देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधू रनर टीम ने सावंतवाडी 12 तास हा अभिनव उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेले आहे. सावंतवाडी 12 तास या उपक्रमाच्या आरंभासाठी सिंधुदुर्ग टीमने कोकण तसेच महाराष्ट्रातील तमाम धावपटूंना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. सावंतवाडी 12 तास रन पर्वत चौथे “वराह अवतार” या थीम अंतर्गत बारा तास रन आयोजित केली आहे. या उपक्रमामध्ये धावपटूंना बारा तास / सहा तास तसेच तीन तास या विभागांमध्ये भाग घेऊन त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासता येणार आहे. या अभिनव उपक्रमामध्ये जिल्ह्यातून आणि जिल्हा बाहेरून अंदाजे 40 ते 50 धावक सहभागी होतील अशी अपेक्षा सिंधू रनर टीम व्यक्त करत आहे. शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सावंतवाडी राजवाडा येथून रात्री ठीक आठ वाजता या रनला सुरुवात होईल आणि दिनांक 18 ऑगस्ट 2024 सकाळी आठ वाजता या रनची सांगता सावंतवाडी राजवाडा येथे होईल.

या उपक्रमाला भारताचे प्रख्यात जलतरणपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि टॅन झिंग नॉर्वे पुरस्कार विजेते श्री रोहन मोरे यांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहे. यासोबतच सावंतवाडी संस्थांचे युवराज श्री लखन राजे भोसले आणि सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सागर साळुंखे यांचीही उपस्थिती असणार आहे. सावंतवाडी सारख्या सांस्कृतिक. कला आणि क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेल्या आणि निसर्ग संपन्नतेने नटलेल्या शहरांमध्ये धावपटूंना स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासण्याची ही उत्तम संधी सिंधू रनर टीमने उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील, कोकणातील आणि महाराष्ट्रातील धावपटूंनी यात सहभाग घेण्याचे आवाहन सिंधू रनर टीम करत आहे. या रन मध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा ओंकार पराडकर 9420307187 प्रसाद कोरगावकर ७७५६० ९५०५१ डॉक्टर स्नेहल गोवेकर 9422373922. यावर्षी या रनचे वैशिष्ट्य म्हणजे साऊथ आफ्रिका येथे झालेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये भारताचे नेतृत्व केलेले चार धावक यामध्ये सहभागी होणार आहेत. बारा तास सहा तास आणि तीन तास विभागामधील सहभागी धावकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येईल.

अशीच कामगिरी सिंधू रनर टीम यापुढेही बजावत राहील यात शंकाच नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावक तयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळाकडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले आहे.

सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ३ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे. साऊथ आफ्रिका येथे झालेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये यावर्षी सिंधू रनर टीमच्या प्रसाद कोरगावकर आणि ओंकार पराडकर या दोन धावपटूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे आणि देशाचे नाव जगभरात पोचवले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!