26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली बीच टेनिस कार्यशाळेचे आयोजन.!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण प्रतिनिधी|

दिनांक.२८जुलै २०२४ रोजी मालवण दर्यासारंग बीच रिसोर्ट येथे बीच टेनिस या खेळाची एक दिवसाची कार्यशाळा संप्पन झाली. बीच टेनिस हा विदेशात मोठ्या प्रमाणांवर खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ खेळणारे भारतात मोजकेच खेळाडू आहेत . या खेळाडू पैकी ऐस्परर या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी चे सीईओ आणि बीच टेनिस आणि लॉन टेनिस चे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजीत सांगळे यांच्या कंपनी मार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यांच्या सोबत बीच टेनिस फेडरेशन इंडिया चे उपाध्यक्ष तसेच बीच टेनिस चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नत सांगळे हे पण उपस्तिथ होते. यावेळी टोपीवाला हायस्कूल च्या ४४ विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.यावेळी या खेळाडूना या खेळाची माहिती आणि प्रत्यक्ष खेळाची संधी देण्यात आली . या सहभागी सर्व खेळाडूना ऐस्परर या कंपनीकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी टोपीवाला हायस्कूल चे चेअरमन सामंत सर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर , सचिव विजय कामत आणि क्रीडा शिक्षक वारंग सर , दर्यासारंग चे प्रोप्रायटर स्मृती कांदळगांवकर , या कार्यक्रमाचे समन्वयक काजल कांदळगांवकर , वेदांत पोवळे, शंभावी हातखंबकर उपस्थित होते.

या कार्यशाळेचे आयोजन टोपीवाला हायस्कूल ची माजी विद्यार्थिनी आणि ऍस्परर कंपनीची सभासद काजल महेश कांदळगांवकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. आता प्राथमिक रित्या एका शाळेतर्फे थोडक्यात याचे आयोजन करण्यात आले आहे आणि भविष्यात सर्व शाळासाठी ही कार्यशाळा आयोजित केली जाईल अस बीच टेनिस इंडिया चे उपाध्यक्उष न्नत सांगळे यांनी आश्वासित केले. विदेशात सात देशांमध्ये लॉन टेनिस विजेता विश्वजीत सांगळे आणि बीच टेनिस चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नत सांगळे यांनी मालवण सारख्या छोट्या शहरामुळे येवून या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल टोपीवाला हायस्कूल चे चेअरमन सामंत यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मालवण वासियांच्या वतीने या दोन्ही खेळाडूना शालआणि श्रीफळ देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू काजल कांदळगावकर हिची निवड

यावर्षी सप्टेंबर महिन्यात इटली येथे बीच टेनिस वर्ल्डकप होणार आहे. या वर्ल्डकपसाठी टोपीवाला हायस्कूलची माजी विद्यार्थिनी व राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू काजल कांदळगावकर हिची निवड झाली आहे. तसेच टिम इंडियामधून विश्वजीत सांगळे, उन्नत सांगळे, योगेश्वरी हातखामकर, वेदांत पोकळे हे खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारमालवण शहरात हॉटेल दर्यासारंग येथे संपन्न झालेल्या बीच टेनिस कार्यशाळे विषयी चर्चा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!