मालवण | प्रतिनिधी : मालवण एस टी आगार येथे शुक्रवारी १९ जुलै २०२४ रोजी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमास विभाग नियंत्रक आगारात येऊन प्रवाशांच्या व रा. प. कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तांतडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असे एस. टी. महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ. माधव कुसेकर यांच्या आदेशानुसार मालवण एस टी आगार प्रमुख श्री. सचेतन बोवलेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे घोषीत आहे.
दुपारी १० ते २ वाजेपर्यंत तर प्रवासी राजा दिन उपक्रम व दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत कामगार राजा दिन उपक्रम संपन्न होईल.
सदर वेळेत संघटना व रा.प. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न (रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व प्रमादीय कारवाई) तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे तात्काळ निराकरण करतील. तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी व रा. प. कामगार यांनी याचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन मालवण एस टी आगार प्रमुख श्री. सचेतन बोवलेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.