धक्का मित्रमंडळ आयोजीत उपक्रमात ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
मालवण | प्रतिनिधी : मालवण मधील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मामा वारेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. धक्का मित्रमंडळ ‘एक हात मदतीचा’ अशा ब्रीदवाक्यावर सामाजिक कार्य करते. यापूर्वी धक्का मित्रमंडळातर्फे आठ रक्तदान शिबीरे घेण्यात आली होती व हे नववे रक्तदान शिबीर गुरुवारी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न झाले.
या शिबिराचे उदघाटन मालवणचे वाहतूक पोलीस गुरूदास परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिराला रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यासाठी जिल्हा रक्तपेढीच्या डॉक्टर व परिचारिका यांचे सहकार्य लाभले. मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, पत्रकार मनोज चव्हाण, अमित खोत, भूषण मेतर यांचीही उपस्थिती होती.
यावेळी धक्का मित्रमंडळाचे बाबू डायस, हेमंत शिरगांवकर, नितेश जाधव, देवा तोडणकर, भूषण पिसे, गौरेश कांबळी, विशाल आपकर, नितीन कोटीयान, संजय गावडे, अनिकेत चव्हाण, रोहित चव्हाण, शंकर पाटकर, राहुल केळुसकर, शर्मिला गावकर, स्वप्नील कदम, ललित चव्हाण यांसह अन्य सदस्य, मित्रपरिवार उपस्थित होते.