मालवण | प्रतिनिधी : भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते श्री. विष्णू मोंडकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रसिद्धी पत्राद्वारे टीका केली आहे. मोंडकर म्हणतात की, कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी श्री नारायणराव राणे, पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अपेक्षित विकासात्मक प्रकल्प तसेच जिल्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन साठी सक्षम आहे. मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यास लागतो व त्यावर प्रामाणिक पणे काम करावे लागते. उगीचच जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्पांमध्ये त्रुटी काढून जनते सोबत्त असल्याचा दिखाऊ पणा करणे एवढेच काम श्री वैभव नाईक यांना सध्या शिल्लक आहे. वास्तविक कुडाळ मालवण मतदार संघात एम आय डीसी क्षेत्रातील व्यावसायिक, पर्यटन,मच्छिमार, शेती ,आंबा बागायतदार, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात आमदार म्हणून गेल्या दहा वर्षात आश्वासक काम श्री वैभव नाईक काम करू शकले नाहीत तसेच गेल्या दहा वर्षात या मतदार संघाला विकासापासून वंचित ठेवले गेले आहे अशी टीका विष्णू मोंडकर यांनी केली आहे.
विष्णू मोंडकर प्रसिद्धी पत्रात पुढे म्हणतात की, सत्तेत आल्यावर महायुतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकसित प्रकल्पांमध्ये, आमदार वैभव नाईक हे विनाकारण त्रुटी काढत फिरत आहेत. मालवण येथील त्यांनी निदर्शनास आणलेली रेस्टहाऊस आभासी गळती आता बंद झाली आहे व मतदार संघातील मालवण तालुक्यात १० वर्षात शासकीय मैदान उभे न करू शकलेले आमदार महोदय बोर्डीग ग्राउंड येथील मैदानातं जाऊन ज्यावर प्रशासन स्तरावर जो विषय मार्गी लागणार त्यावर जनतेची दिशाभूल करत आहेत असे विष्णू मोंडकर यांनी सांगितले आहे. भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून राज्य सरकार ने पारंपरिक मच्छिमारांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी राज्य स्तरीय मच्छिमार धोरण बनविण्यासाठी समिती गठीत केली आहे तसेच पर्यटन वाढीसाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून स्थानिक भागातील पर्यटन विकासासाठी शासनाने कमिटी गठीत करून यावर काम सुरु केले आहे ,जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी महायुती च्या माध्यमातून जनतेसाठी अनेक विकासात्मक धोरण राबवत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.वंदश्री योजना, महिलांसाठी मोफत गॅस योजना, पर्यटन मच्छिमार यांसाठी राज्य सरकार कडून प्रत्यक्ष कार्यवाही सुरु झाल्याने श्री वैभव नाईक यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे. कुडाळ मालवण मधील जनतेच्या भावनेशी खेळून आणि ठेकेदारी व्यावसायिक राजकारण केलेल्या श्री वैभव नाईक यांना जनताच २०२४ मध्ये माजी आमदार बनवणार आहे असा विश्वास विष्णू मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्रात व्यक्त केला आहे.
उथळ पाण्याला खळखळाट फार अशी अवस्था झालेले श्री वैभव नाईक मतदार संघाचे समस्या मांडण्यासाठी हल्ली जास्तच केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत दहा वर्षात आमदार म्हणून सूर गवसला नाहीच फक्त श्री नारायण राणे साहेब यानां विरोध करून दहशत याचा बाऊ करून निवडून आलेल्या आमदार श्री वैभव नाईक यांना दुर्दैवाने फक्त ठेकेदारी या विषयात सूर गवसलेला आमदार म्हणून जनता येणाऱ्या काळात लक्षात ठेवेल. हल्लीच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत सिंधुदुर्गच्या जनतेने श्री नारायण राणे साहेब यांना भरघोस मतांनी निवडून खासदार बनवले आणि श्री विनायक राऊत व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यांची योग्य जागा जनतेने दाखविली आहे अशी टीका भाजपा जिल्हा प्रवक्ते विष्णू मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केलो आहे.