23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मसुरेचा सुपुत्र रुपेश दुखंडे वारकऱ्यांच्या सेवेला…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : पंढरीच्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी हा विचार मनामध्ये घेऊन मसुरे मागवणे गांवचे सुपुत्र आणि भराडी देवी मंडळ दिवा ठाणे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. रुपेश दुखंडे आणि त्यांचे सहकारी यांनी लोणंद गावी विठुरायाच्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे निश्चित केले. लोणंद गावी या सर्व वारकऱ्यांना मोफत चहा बिस्कीट पाणी बॉटल आणि नाश्ता देण्यात आला. तसेच या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.

मसुरे मागवणे वाडी येथील रुपेश दुखंडे हा एक भक्त प्रतीवर्षी आपल्या संस्थेमार्फत या वारकऱ्यांन साठी हा अनोखा उपक्रम घडवून आणत असतोत. या उपक्रमाचे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी कौतुक केले. यावेळी श्री रुपेश दुखंडे कृष्णा चौगुले, संभाजी कणसे, देवेंद्र चव्हाण, अमोल दळवी, अरविंद घोगळे, महेश साटम, गिरीश ‌चिंदरकर, समीर तावडे, जयवंत गावडे, कमलेश मालवणकर, ओमकार चव्हाण, बलराज शिंदे, यज्ञेश परब, सतीश मुसळे, महाराजा मुपनर इत्यादी सहकारी उपस्थित होते. या मंडळाचे हे सर्व सहकारी सुद्धा प्रतिवर्षी रुपेश दुखंडे यांच्यासोबतच ही सेवा करत असतात. मंडळाच्या वतीने रुपेश दुखंडे यांनी सर्व वारकऱ्यांना पुढील वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : पंढरीच्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी हा विचार मनामध्ये घेऊन मसुरे मागवणे गांवचे सुपुत्र आणि भराडी देवी मंडळ दिवा ठाणे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. रुपेश दुखंडे आणि त्यांचे सहकारी यांनी लोणंद गावी विठुरायाच्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे निश्चित केले. लोणंद गावी या सर्व वारकऱ्यांना मोफत चहा बिस्कीट पाणी बॉटल आणि नाश्ता देण्यात आला. तसेच या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.

मसुरे मागवणे वाडी येथील रुपेश दुखंडे हा एक भक्त प्रतीवर्षी आपल्या संस्थेमार्फत या वारकऱ्यांन साठी हा अनोखा उपक्रम घडवून आणत असतोत. या उपक्रमाचे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी कौतुक केले. यावेळी श्री रुपेश दुखंडे कृष्णा चौगुले, संभाजी कणसे, देवेंद्र चव्हाण, अमोल दळवी, अरविंद घोगळे, महेश साटम, गिरीश ‌चिंदरकर, समीर तावडे, जयवंत गावडे, कमलेश मालवणकर, ओमकार चव्हाण, बलराज शिंदे, यज्ञेश परब, सतीश मुसळे, महाराजा मुपनर इत्यादी सहकारी उपस्थित होते. या मंडळाचे हे सर्व सहकारी सुद्धा प्रतिवर्षी रुपेश दुखंडे यांच्यासोबतच ही सेवा करत असतात. मंडळाच्या वतीने रुपेश दुखंडे यांनी सर्व वारकऱ्यांना पुढील वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!