24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

परुळेकर गल्लीत पडलेले झाड हटवले ; माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांचे नगरपरिषद कर्मचारी वर्गासह मदतकार्य.

- Advertisement -
- Advertisement -

मुसळधार पाऊस व जोरदार वारा यामुळे झाड पडून तुटलेल्या वीज वाहिन्याही पूर्ववत.

मालवण | प्रतिनिधी : मालवण मधील परुळेकर गल्ली येथे आज ( दि. १५ जुलै) दुपारी सोसाट्याच्या वार्याने एक झाड कोसळले. त्यानंतर तिथली रहदारी ठप्प झाली व काही वीज वाहिन्या तुटल्या. ही बाब, मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तिथे जाऊन पहाणी केली. यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी वर्ग व काही नागरिकांच्या साथीने श्री यतीन खोत यांनी ते झाड बाजुला हटवले. या नंतर रहदारी व वीज वाहिन्या पूर्ववत करण्यात आल्या.

मुसळधार पावसात केलेल्या या मदतकार्यात माजी बांधकाम सभापती यतीन खोत व नगपरीषद मुकादम आनंद वळंजु व इतर कर्मचारी यांच्या साथीने समीर शेख़, विकी, श्री. बांदिवडेकर यांनी योगदान दिले. या मदतकार्यानंतर परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व मदत कार्यातील सर्वांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुसळधार पाऊस व जोरदार वारा यामुळे झाड पडून तुटलेल्या वीज वाहिन्याही पूर्ववत.

मालवण | प्रतिनिधी : मालवण मधील परुळेकर गल्ली येथे आज ( दि. १५ जुलै) दुपारी सोसाट्याच्या वार्याने एक झाड कोसळले. त्यानंतर तिथली रहदारी ठप्प झाली व काही वीज वाहिन्या तुटल्या. ही बाब, मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तिथे जाऊन पहाणी केली. यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी वर्ग व काही नागरिकांच्या साथीने श्री यतीन खोत यांनी ते झाड बाजुला हटवले. या नंतर रहदारी व वीज वाहिन्या पूर्ववत करण्यात आल्या.

मुसळधार पावसात केलेल्या या मदतकार्यात माजी बांधकाम सभापती यतीन खोत व नगपरीषद मुकादम आनंद वळंजु व इतर कर्मचारी यांच्या साथीने समीर शेख़, विकी, श्री. बांदिवडेकर यांनी योगदान दिले. या मदतकार्यानंतर परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व मदत कार्यातील सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!