26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक यांनी मान्सून महोत्सवाला भेट देत दशावतारी कलाकारांना दिले प्रोत्साहन.

- Advertisement -
- Advertisement -

प्रेक्षकांत बसून घेतला नाटकाचा आस्वाद : आयोजकांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप.

कुडाळ : दशावतार ही कला प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. या कलेचे आणि कोकणी माणसाचे अतुट नाते आहे. मलाही या कलेचा अभिमान आहे. या कलेसाठी पावसाच्या कालावधीत प्रोत्साहन देणाऱ्या लाजरी क्रिकेट ग्रुपच्या आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी दशावतारी कलाकार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांना शाबासकी देत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी प्रेक्षकांत बसून संयुक्त दशावतारी नाटकाचा आस्वाद घेत, दशावतारी कलाकारांना अधिक प्रोत्साहन दिले.

कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय ( रेल्वेस्टेशन रोड) कुडाळ येथे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या वतीने मान्सुन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पहिल्या दिवशी सिंधुदुर्गातील आघाडीच्या दशावतारी कलाकारांचा सहभाग असलेले संयुक्त दशावतारचा महारथी कर्ण हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. हा नाट्यप्रयोग सुरू असताना शनिवारी रात्री कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सवाला भेट दिली. यावेळी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, सुशील चिंदरकर, अमित राणे, स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते.

या सर्वांचे स्वागत लाजरी क्रिकेट ग्रुप अध्यक्ष राजू पाटणकर व सहका-यांनी केले. आमदार वैभव नाईक यांचा यावेळी आयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, सचिव स्वरूप सावंत, संजय करलकर, दिपक भोगटे, गजानन गवस, दिनेश गोरे, बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा प्रकाश पारकर, दशावतारी कलाकार दिनेश गोरे, लाजरी क्रिकेट ग्रुपचे अनुप शिरसाट, यतीन सामंत, गोट्या कोरगावकर, सिद्धेश बांदेकर, नागेश नार्वेकर, सिद्धेश वर्दम व अन्य सदस्य उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, दशावतार कला ही शेकडो वर्षांची कला आहे. ही कला जोपासण्याचे काम दशावतारी कलाकार करीत आहेत. त्यांना लाजरी क्रिकेट ग्रुप मान्सून महोत्सव आयोजित करून अधिक प्रोत्साहन मिळवून देत आहे. रसिक म्हणून आपण सर्वांनीच या कलेला प्रोत्साहन दिले पाहीजे. हि कला जिवंत ठेवण्यासाठी दशावतारी कलाकार मेहनत घेत आहेत, हे कौतुकास्पद आहे. शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील. लाजरी क्रिकेट ग्रुपचे कार्य कौतुकास्पद आहे. अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, स्वरूप सावंत, दिपक भोगटे व अन्य सर्वच सदस्य धडाडीने चांगले कार्य करीत असल्याचे गौरवोद्‌गार आ.नाईक यांनी काढले. यावेळी त्यांनी आयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दशावतारी कलेचे त्यांनी कौतुक करीत या कलेसाठी आपणाकडून जे शक्य असेल ते प्रयत्न केले जातील असे वचन देत उपस्थित सर्वांची मने जिंकली. तसेच रंगमंचासमोर प्रेक्षकवर्गात बसून महारथी कर्ण या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेत उपस्थित कलाकार आणि रसिकांची मने जिंकली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रेक्षकांत बसून घेतला नाटकाचा आस्वाद : आयोजकांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप.

कुडाळ : दशावतार ही कला प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. या कलेचे आणि कोकणी माणसाचे अतुट नाते आहे. मलाही या कलेचा अभिमान आहे. या कलेसाठी पावसाच्या कालावधीत प्रोत्साहन देणाऱ्या लाजरी क्रिकेट ग्रुपच्या आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी दशावतारी कलाकार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांना शाबासकी देत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी प्रेक्षकांत बसून संयुक्त दशावतारी नाटकाचा आस्वाद घेत, दशावतारी कलाकारांना अधिक प्रोत्साहन दिले.

कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय ( रेल्वेस्टेशन रोड) कुडाळ येथे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या वतीने मान्सुन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पहिल्या दिवशी सिंधुदुर्गातील आघाडीच्या दशावतारी कलाकारांचा सहभाग असलेले संयुक्त दशावतारचा महारथी कर्ण हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. हा नाट्यप्रयोग सुरू असताना शनिवारी रात्री कुडाळ - मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सवाला भेट दिली. यावेळी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, सुशील चिंदरकर, अमित राणे, स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते.

या सर्वांचे स्वागत लाजरी क्रिकेट ग्रुप अध्यक्ष राजू पाटणकर व सहका-यांनी केले. आमदार वैभव नाईक यांचा यावेळी आयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, सचिव स्वरूप सावंत, संजय करलकर, दिपक भोगटे, गजानन गवस, दिनेश गोरे, बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा प्रकाश पारकर, दशावतारी कलाकार दिनेश गोरे, लाजरी क्रिकेट ग्रुपचे अनुप शिरसाट, यतीन सामंत, गोट्या कोरगावकर, सिद्धेश बांदेकर, नागेश नार्वेकर, सिद्धेश वर्दम व अन्य सदस्य उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, दशावतार कला ही शेकडो वर्षांची कला आहे. ही कला जोपासण्याचे काम दशावतारी कलाकार करीत आहेत. त्यांना लाजरी क्रिकेट ग्रुप मान्सून महोत्सव आयोजित करून अधिक प्रोत्साहन मिळवून देत आहे. रसिक म्हणून आपण सर्वांनीच या कलेला प्रोत्साहन दिले पाहीजे. हि कला जिवंत ठेवण्यासाठी दशावतारी कलाकार मेहनत घेत आहेत, हे कौतुकास्पद आहे. शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील. लाजरी क्रिकेट ग्रुपचे कार्य कौतुकास्पद आहे. अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, स्वरूप सावंत, दिपक भोगटे व अन्य सर्वच सदस्य धडाडीने चांगले कार्य करीत असल्याचे गौरवोद्‌गार आ.नाईक यांनी काढले. यावेळी त्यांनी आयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दशावतारी कलेचे त्यांनी कौतुक करीत या कलेसाठी आपणाकडून जे शक्य असेल ते प्रयत्न केले जातील असे वचन देत उपस्थित सर्वांची मने जिंकली. तसेच रंगमंचासमोर प्रेक्षकवर्गात बसून महारथी कर्ण या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेत उपस्थित कलाकार आणि रसिकांची मने जिंकली.

error: Content is protected !!