शासनाच्या निर्णया विषयी मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार.
मालवण | प्रतिनिधी : मालवणचे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी शासनाच्या ड्रोनने सागरी निगराणी संदर्भातील शासनाच्या निविदा प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती दिली असून यासाठी आमदार वैभव नाईक व किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छिमार यांनी सतत पाठपुरावा केला असल्याचे सांगत व सहकार्य केलेल्या मच्छिमार बांधवांचे आभार मानले आहेत.
आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि श्रमिक मच्छीमार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडीकिनारी ड्रोन्स प्रात्यक्षिक घेऊन केले होते. ते रेकॉर्डिंग शासनाला सादर केलेले होते. या ड्रोनचा वापर किनाऱ्यावरणा सुद्धा करता येणार आणि ज्या बोटी गस्तीच्या बोटीला बघून पळून जातात किंवा अधिकाऱ्यांनी इशारा करू नये थांबत नाहीत अशा बोटीन वरती आत्ता कारवाई करणे शक्य होणार आहे. या संदर्भात निविदा प्रक्रीया ११ जुलै ते २५ जुलै अशी असून त्याविषयी फिशरीज ऑफिसमध्ये माहिती मिळणार आहे असे बाबी जोगी यांनी स्पष्ट केले आहे.
आपली रोजी रोटी वाचवण्यासाठी जे मच्छीमार किंवा संघटना संघर्ष करतात त्यांच्यासाठी हा थोडासा दिलासा आहे. या ड्रोन चा वापर चांगल्या प्रकारे केल्यास याचा उपयोग अनधिकृत बोटींना आळा बसू शकतो सर्व अधिकाऱ्यांनी याचा उपयोग मच्छीमाऱ्यांच्या हितासाठी करावा ही अपेक्षा तसेच आमदार वैभव नाईक आणि ज्या ज्या आमदार मच्छीमार संघटना यांचे सर्वांचे सहकार्य लाभले त्यामुळे मच्छीमार्यांतर्फे आम्ही तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत तसेच मच्छीमारांनी सुद्धा संघर्ष केलेल्याचं काही अंशी यश आपल्याला मिळत आहे. आपण सर्व मच्छिमार बांधव हा लढा पूर्ण न्याय मिळेपर्यंत चालू ठेवणार आहोत असेही मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी सांगितले आहे.