मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची रीतसर स्थापना झाली असून त्याला सहायक निबंधक संस्था सिंधुदुर्गची मान्यता मिळाली आहे. सदर मान्यता मिळाल्या बाबतचे पत्र (प्रमाणपत्रासहीत) जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी ( सिईओ) मकरंद देशमुख यांना नुकतेच सादर करण्यात आले. सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, मुख्य लेख अर्थ विभाग अधिकारी, तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना निवेदने देण्यासाठी तालुक्याच्या प्रत्येक ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकारी यांचेकडे निवेदने देण्यात आली.
यावेळी सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश राणे, कोषाध्यक्ष राजाराम जाधव तसेच प्रमुख पदाधिकारी अंकुश मुणगेकर, भास्कर केरवडेकर, विठ्ठल वाटवे, गोकुळ शिरसाट, रामा ठाकुर, दिपक मर्गज, हरमलकर,नाऊ बोडेकर, संजय गावडे, एन व्ही साटम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.