देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर यांच्या हस्ते सौ. स्नेहा नाईक यांचा सत्कार.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी भेट देऊन श्री रामेश्वर चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी,माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण आणि दादा गांवकर, आपा गांवकर, अरविंद गांवकर, राजन गांवकर, विजय गांवकर, गणेश गांवकर, अक्षय गावकर, कल्पेश गांवकर, दिनेश गांवकर, राजेश गांवकर, उदय गांवकर, बाबा गांवकर, योगेश गांवकर,संजय लुडबे, राजन बांदेकर, सिताकांत गावकर, रमेश गांवकर, कमलाकर गांवकर, जगदिश गांवकर, आनंद गांवकर, महेश लुडबे, दीपा शिंदे, यशवंत गावकर, सुहास वालावलकर, उमेश मांजरेकर, निनाक्षी शिंदे, सोनाली डिचोलकर, किशोर गावकर , उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर , राजू परब, मनोज मोंडकर, करण खडपे, जयदेव लोणे तसेच देवस्थान विश्वस्त गांवकर मानकरी, मंदिर पुजारी श्री. भूषण राऊळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.