मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे व्हाॅईस ऑफ मिडिया, सिंधुदुर्गच्या यांच्यावतीने पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा संपन्न झाला. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ नाथ पै सभागृहात, ७ जुलैला हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, युवा नेते श्री विशाल परब, माजी आमदार राजन तेली, कोकण विभागिय महिला नेत्या सौ. अर्चना घारे, व्हाॅईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील सामाजिक दिग्गज तथा मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. व्हाॅईस ऑफ मिडिया, सिंधुदुर्गच्या पदाधिकार्याच्या वतीने, उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते व सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विशाल परब यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मंचावर उपस्थित मान्यवर, व्हाॅईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी व पत्रकारांनी त्यांच्या स्मृतीस वंदन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्गचे अध्यक्ष परेश राऊत यांनी व्हाॅईस ऑफ मिडियाचा उद्देश, कार्यपध्दती आणि उपक्रमांची माहिती दिली.
युवा नेते श्री. विशाल परब यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. भविष्यात शेती, शिक्षण, मनोरंजन आदी पैलूंवर आधारित कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया कडून घेण्यात यावेत व त्यासाठी आपला पक्ष व आपण सहकार्य करु अशी त्यांनी ग्वाही दिली.
यानंतर माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थितांना संबोधीत करताना सांगितले की दहावी आणि बारावीच्या गुणांमध्ये अग्रेसर असणारी आपली कोकणातील मुले, , योग्य मार्गदर्शना अभावी स्पर्धा परीक्षांमध्ये अग्रेसर झालेली दिसत नाहीत ही खंत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यापुढे येथील जिल्हाधिकारी, तहसीलदार व उच्च पदस्थ प्रशासकीय व्यक्ती कोकणातीलच दिसतील. राजकारणी क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन या मुलांसाठी काम केल्यास कोकणातील मुले राज्यातच नाही तर देशात अव्वल येतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली.
यानंतर शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार श्री दिपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांची देशव्यापी संघटना आहे. त्यामुळे देशभरात व्हॉईस ऑफ मीडियाचे अनेक कार्यक्रम देशभरात होत असतात. मुंबईतील कार्यक्रमात पालकमंत्री या नात्याने मला निमंत्रण असतेच परंतु आज माझ्या मतदारसंघात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी मला प्रथमच मिळाली हे मी माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ‘व्होकेशनल गायडन्स’ बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी महिला नेत्या अर्चना घारे परब यांनी गुणवंत पत्रकार पाल्यांचे अभिनंदन केले आणि व्हाॅईस ऑफ मिडियाच्या या उपक्रमांची विशेष प्रशंसा केली.
यावेळी आयोजीत करीअर मार्गदर्शन सत्रात सुप्रसिद्ध मोटीव्हेशनल स्पीकर श्री दिनेश गुप्ता यांनी संवाद व डिजीटल प्रेझेंटेशन द्वारा चर्चा घडवून आणत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी आमदार राजन तेली, व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्गचे अध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर म्हाडेश्वर, सावंतवाडीच्या कोकण विभागिय महिला नेत्या सौ. अर्चना घारे परब, व्हाॅईस ऑफ मिडिया मुंबई कार्याध्यक्ष तुषार रसाळ, माजी नगरसेवक श्री. नेवगी, तसेच व्हाॅईस ऑफ मिडिया उपाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष विष्णू धावडे, उपाध्यक्ष भूषण सावंत, सह सचिव संजय पिळणकर, खजिनदार शैलेश मयेकर, संघटक आनंद कांडरकर, नागेश दुखंडे, सह खजिनदार वासुदेव गावडे, सुयोग पंडित, राजेश हेदळकर, चिन्मय घोगळे, सुमित दळवी, प्रथमेश गवस, शंकर जाधव, अतुल गुडेकर, शुभम धुरी, सतिश हरमळकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातले पत्रकार बांधव उपस्थित होते. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक सौ. फिलोमीना पंडित, सौ. खरात यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
व्हाॅईस ऑफ मिडिया, सिंधुदुर्गच्या पत्रकार पाल्य गुणगौरव व कौतुक या गौरव आणि सत्कार सोहळ्याला पत्रकारांच्या पाल्यांनी सादर केलेल्या स्वागत नृत्याची मान्यवरांनी विशेष प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले आणि व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्गचे सल्लागार प्रा. बी एन खरात यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमात विशेष सत्कार केलेल्या महिला बचत गटांच्या सदस्यांनी व्हाॅईस ऑफ मिडियाचे आभार मानले.