27.1 C
Mālvan
Wednesday, April 23, 2025
IMG-20240531-WA0007

गांजा बाळगल्या प्रकरणी संशयितांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मालवण आडारीवाडी मार्गांवर शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून केलेल्या कारवाईत ४७० ग्राम गांजासह विशाल प्रकाश वडर (वय २७ ,रा. पोईप), आदित्य राजाराम नेरुरकर (वय २६, रा. विरण) या दोघा संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर त्यांना मालवण पोलिसांनी अटक केली. एक दुचाकीही जप्त केली होती. शनिवारी संशयितांना मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीसांच्या वतीने ५ दिवस पोलिस कोठडी मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.

संशयित आरोपी क्रमांक १ विशाल प्रकाश वडर तर्फे ॲड. अंबरीष गावडे व ॲड. स्वरुप पई यांनी काम पाहिले तर आरोपी क्रमांक २ आदित्य राजाराम नेरूरकर तर्फे ॲड. उल्हास कुलकर्णी यांनी काम पाहिले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मालवण आडारीवाडी मार्गांवर शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून केलेल्या कारवाईत ४७० ग्राम गांजासह विशाल प्रकाश वडर (वय २७ ,रा. पोईप), आदित्य राजाराम नेरुरकर (वय २६, रा. विरण) या दोघा संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर त्यांना मालवण पोलिसांनी अटक केली. एक दुचाकीही जप्त केली होती. शनिवारी संशयितांना मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीसांच्या वतीने ५ दिवस पोलिस कोठडी मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.

संशयित आरोपी क्रमांक १ विशाल प्रकाश वडर तर्फे ॲड. अंबरीष गावडे व ॲड. स्वरुप पई यांनी काम पाहिले तर आरोपी क्रमांक २ आदित्य राजाराम नेरूरकर तर्फे ॲड. उल्हास कुलकर्णी यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!