25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘सिंधुदुर्गची नवी कविता’ काव्यग्रंथात कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्गातील नव्या कवींना मंच उपलब्ध करून देऊन त्यांची काव्य गुणवत्ता महाराष्ट्रातील चांगल्या वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी समाज साहित्य प्रतिष्ठान या चळवळीच्या माध्यमातून ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा ग्रंथ संपादित करण्यात आला. समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी संपादन केलेल्या या काव्यग्रंथात परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते तथा नवोदित कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा काव्यग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कोकणबरोबरचे महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता वाचकांसमोर यावी या एकमेव हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची नवी कविता हा १६ कवींचा कवितांचा सहभाग असलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यात कवयित्री प्रियदर्शनी पारकर म्हाडगुत, डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, किशोर कदम, चेतन बोडेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत – भोसले, योगिता शेटकर, प्रा. संतोष जोईल, दिलीप चव्हाण, पल्लवी शिरगावकर, सुरेश बिले, रचना रेडकर, मंगल नाईक – जोशी, संदीप कदम आणि सत्यवान साटम यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा समावेश आहे.

कवी किशोर कदम हे कलमठ गांवचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या पाच कवितांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला हा गांवचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. कवी किशोर कदम यांचे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, ओसरगांवच्या सरपंच सुप्रीया कदम, जिवबा अपराज, सुरेश हरकुळकर, शितल दळवी, राजश्री तांबे, प्रमीता तांबे यांनी अभिनंदन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्गातील नव्या कवींना मंच उपलब्ध करून देऊन त्यांची काव्य गुणवत्ता महाराष्ट्रातील चांगल्या वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी समाज साहित्य प्रतिष्ठान या चळवळीच्या माध्यमातून 'सिंधुदुर्गची नवी कविता' हा ग्रंथ संपादित करण्यात आला. समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी संपादन केलेल्या या काव्यग्रंथात परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते तथा नवोदित कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला आहे. 'सिंधुदुर्गची नवी कविता' हा काव्यग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कोकणबरोबरचे महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता वाचकांसमोर यावी या एकमेव हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची नवी कविता हा १६ कवींचा कवितांचा सहभाग असलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यात कवयित्री प्रियदर्शनी पारकर म्हाडगुत, डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, किशोर कदम, चेतन बोडेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत - भोसले, योगिता शेटकर, प्रा. संतोष जोईल, दिलीप चव्हाण, पल्लवी शिरगावकर, सुरेश बिले, रचना रेडकर, मंगल नाईक - जोशी, संदीप कदम आणि सत्यवान साटम यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा समावेश आहे.

कवी किशोर कदम हे कलमठ गांवचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या पाच कवितांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला हा गांवचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. कवी किशोर कदम यांचे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, ओसरगांवच्या सरपंच सुप्रीया कदम, जिवबा अपराज, सुरेश हरकुळकर, शितल दळवी, राजश्री तांबे, प्रमीता तांबे यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!