28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

भारतावर झिंबाब्वेची मात ; भारतीय क्रिकेट संघाची टी २० तील अपराजीतता भंगली..!

- Advertisement -
- Advertisement -

क्रीडा | ब्यूरो न्यूज : पाच सामन्यांच्या टी २० मालिका असून यात झिम्बाब्वेने १ – ० ने आघाडी घेतली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आज, ६ जुलैला दारूण पराभव झाला आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या ११६ धावा भारताला करता आल्या नाहीत.

टी २० क्रिकेटमध्ये नव्या संघाची बांधणी म्हणून झिम्बाब्वे दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत कोण कशी कामगिरी करतं याकडे लक्ष आहे. मात्र पहिल्याच सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. झिम्बाब्वेने भारताला १३ धावांनी पराभूत केले आहे. कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसल्याचं दिसून आलं. झिम्बाब्वेने २० षटकात ९ गडी गमवून ११५ धावा केल्या आणि विजयासाठी ११६ धावांचं आव्हान दिलं. मात्र सर्वच रंगाचा भंग झाल्याचं दिसून आलं. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला. कर्णधार शुबमन गिलने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र विजयाच्या वेशीपर्यंत नेऊ शकला नाही. त्यामुळे भारतावर पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारण्याची वेळ आहे. शुबमन गिलने २९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. मात्र इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. टी २० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारणारा शुबमन गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे या यादीत होते. दुसरीकडे, २०२४ या वर्षातील टीम इंडियाचा पहिलाच पराभव आहे.

झटपट विकेट पडत असताना चेंडू आणि धावांमधील अंतरही वाढत होतं. त्यामुळे शेपटाकडेच्या फलंदाजांना फलंदाजी करणं खूपच कठीण गेलं. त्यात दिग्गज फलंदाज तग धरू शकले नाही, तर आपली काय गत असंच त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच फेल ठरले. अभिषेक शर्माला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. रियाने परागने 2२ तर ध्रुव जुरेलने ७ धावा केल्या. रिंकू सिंहकडून भरपूर अपेक्षा असताना त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले हे खेळाडू मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात झिरो ठरले. वॉशिंग्टन सुंदरने ३४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. मात्र तो देखील विजय मिळवून देऊ शकला नाही.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

क्रीडा | ब्यूरो न्यूज : पाच सामन्यांच्या टी २० मालिका असून यात झिम्बाब्वेने १ - ० ने आघाडी घेतली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आज, ६ जुलैला दारूण पराभव झाला आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या ११६ धावा भारताला करता आल्या नाहीत.

टी २० क्रिकेटमध्ये नव्या संघाची बांधणी म्हणून झिम्बाब्वे दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत कोण कशी कामगिरी करतं याकडे लक्ष आहे. मात्र पहिल्याच सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. झिम्बाब्वेने भारताला १३ धावांनी पराभूत केले आहे. कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसल्याचं दिसून आलं. झिम्बाब्वेने २० षटकात ९ गडी गमवून ११५ धावा केल्या आणि विजयासाठी ११६ धावांचं आव्हान दिलं. मात्र सर्वच रंगाचा भंग झाल्याचं दिसून आलं. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला. कर्णधार शुबमन गिलने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र विजयाच्या वेशीपर्यंत नेऊ शकला नाही. त्यामुळे भारतावर पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारण्याची वेळ आहे. शुबमन गिलने २९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. मात्र इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. टी २० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारणारा शुबमन गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे या यादीत होते. दुसरीकडे, २०२४ या वर्षातील टीम इंडियाचा पहिलाच पराभव आहे.

झटपट विकेट पडत असताना चेंडू आणि धावांमधील अंतरही वाढत होतं. त्यामुळे शेपटाकडेच्या फलंदाजांना फलंदाजी करणं खूपच कठीण गेलं. त्यात दिग्गज फलंदाज तग धरू शकले नाही, तर आपली काय गत असंच त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच फेल ठरले. अभिषेक शर्माला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. रियाने परागने 2२ तर ध्रुव जुरेलने ७ धावा केल्या. रिंकू सिंहकडून भरपूर अपेक्षा असताना त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले हे खेळाडू मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात झिरो ठरले. वॉशिंग्टन सुंदरने ३४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. मात्र तो देखील विजय मिळवून देऊ शकला नाही.

error: Content is protected !!