23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भावी पिढीच्या भविष्यासाठी पर्यावरणाची जोपासना ही काळाची गरज :अनिल हळदिवे.

- Advertisement -
- Advertisement -

गोगटे वाळके महाविद्यालयाच्या रानजाई निसर्ग मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

बांदा | राकेश परब : वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षाची जोपासना करणे ही आपली जबाबदारी असते. वृक्ष आयुष्यभर आपल्याला आनंद देतात. परंतु मानव आपल्या अभिलाषेपोटी वृक्षतोड करताना दिसून येतो. भविष्यात वृक्ष तोड रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो याची जाणीव ठेवून आपण निसर्गाचे देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड करावी असे प्रतिपादन श्री. अनिल हळदीवे यांनी केले. येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या रानजाई निसर्ग मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदीवे बोलत होते. ते पुढे म्हणाले की सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावला पाहिजे आणि त्यामधून समाजाचे हित जपले पाहिजे. भावी पिढीच्या भविष्यासाठी पर्यावरणाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. ही जगभराची समस्या असून त्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. निसर्ग हा पशुपक्ष्यांचा अधिवास असून तो टिकवणे हे आपली जबाबदारी आहे. वृक्ष लागवडीमुळे आपण निसर्ग आणि पर्यायाने पृथ्वी वाचवू शकतो असे यावेळी डॉ. काजरेकर यांनी प्रतिपादन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे सचिव श्री. बाबली वायंगणकर उपस्थित होते. जागतिक तापमान वाढीचे परिणाम आज आपण भोगत आहोत. निसर्गाचा ऱ्हास होऊ न देता विकास करणे आवश्यक आहे. वृक्षतोडीमुळे मातीची धूप होते. म्हणूनच वृक्षतोड न करता वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करा. वृक्ष हा पशुपक्ष्यांचा आधार असतो म्हणूनच चांगली झाडे लावून झाडे जगण्यासाठी प्रयत्न करा असे याप्रसंगी वायंगणकर म्हणाले.

सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे श्री. अभय नाईक यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या रानजाई निसर्ग मंडळाचे उद्घाटन करून परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत रानजाई निसर्ग मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शिरोडकर यांनी केले. मान्यवरांचे आभार रानजाई निसर्ग मंडळाचे सदस्य व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रश्मी काजरेकर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, रानजाई निसर्ग मंडळाचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!