24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयीत ताब्यात व एक दुचाकी जप्त ; मालवण पोलिसांची कारवाई.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिसांनी गांजा बाळगल्याच्या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मालवण – आडारीवाडी मार्गावर मालवण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघा युवकांना ४७० ग्रॅम गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. यात एक दुचाकीही पोलिसांनी जप्त करण्यात आली आहे. विशाल वडर (वय २७, रा. पोईप), आदित्य नेरुरकर (वय २६, रा. विरण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित युवकांची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केला आहे.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पथकाने गोपनीय माहिती आधारे ही कारवाई केली गेली आहे. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक आनंदा यशवंते, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, प्रतीक जाधव, राजाराम तेरेखोलकर, महादेव घागरे यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

या प्रकरणी सखोल चौकशी सूरू असून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात यातील सहभागींचा शोध घेतला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिसांनी गांजा बाळगल्याच्या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मालवण - आडारीवाडी मार्गावर मालवण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघा युवकांना ४७० ग्रॅम गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. यात एक दुचाकीही पोलिसांनी जप्त करण्यात आली आहे. विशाल वडर (वय २७, रा. पोईप), आदित्य नेरुरकर (वय २६, रा. विरण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित युवकांची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केला आहे.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पथकाने गोपनीय माहिती आधारे ही कारवाई केली गेली आहे. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक आनंदा यशवंते, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, प्रतीक जाधव, राजाराम तेरेखोलकर, महादेव घागरे यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

या प्रकरणी सखोल चौकशी सूरू असून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात यातील सहभागींचा शोध घेतला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!