23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती छेडणार धरणे आंदोलन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्र्नांची सोडवणूक व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने गेल्या काही महिन्यात चार ते पाच वेळा निवेदने देवून,अधिकारी यांच्या भेटी घेवून लक्ष वेधले होते. परंतू सातत्याने पाठपुरावा करूनही प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने ओरोस येथे ९ जुलै २०२४ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात आला आहे.

( जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे)

शिक्षकांच्या पुढील प्रश्नांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
१)आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लगेच कार्यमुक्त करण्यात यावे व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबून संबंधित बदलीधारक शिक्षकांना सदरच्या रिक्त जागा दाखविण्यात याव्यात. २)समांतर आरक्षणातील समुपदेशन झालेल्या शिक्षकांना आचारसंहिता संपताच तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत. ३)पवित्र प्रणालीने भरती करण्यात येत असलेल्या नवनियुक्त शिक्षक पद भरती बाबतचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्यात यावे. ४)नवनियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी तातडीने मिळणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी. ५)२००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डीसीपीएस रक्कम व सहाव्या वेतन आयोगाचे एक ते पाच हप्ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा करणे बाबत. ६) निमशिक्षकांची(वस्तीशाळा) नियुक्ती शासन निर्णयांच्या दिनांकापासून करण्यात यावी व फरक मिळणे बाबत. ७) विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षकांचे प्रमोशन बाबत. ८) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इंधन व भाजीपाला अनुदान व धान्यदी माल वेळेत मिळण्या बाबत. ९) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी बाबत. १०) २००६ ते ५ सप्टेंबर २०१८ पूर्वीच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वेतन वाढ निश्चिती प्रस्तावा बाबत. ११)माध्यमिक कडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या व तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना स्थायी आदेश मिळण्याबाबत. १२) सन २०१९ मधील मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक मिळणे बाबत. १३) २००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्या बाबत. १४) महाराष्ट्र दर्शन व प्रवास भत्ते बिले मिळणेबाबत.१५)चार टक्के सादील अनुदान मिळणे बाबत.१६) जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी क्रीडा स्पर्धा व विद्यार्थी उपक्रमाबाबत व शिक्षकांना पूर्ण वेळ मुलांना शिकविण्यास देणे बाबत. १७) प्रभारी केंद्रप्रमुख नेमणुकीबाबत. १८) प्रलंबित गणित विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना तात्काळ नियुक्ती देण्याबाबत. १९) निवड श्रेणी प्रस्तावा बाबत २०) नवनियुक्त शिक्षकांचे सेवासातत्य प्रस्ताव तात्काळ मागविण्याबाबत२१) शनिवारच्या शाळेच्या वेळेबाबत फेरविचार करण्याबाबत.

वरील प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस प्रशासनाला देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!