28.3 C
Mālvan
Thursday, November 14, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN
IMG-20241113-WA0000

मालवणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कागद ऑनलाईन पूर्तता व माहिती कॅम्पचे आयोजन ; भाजपा महिला आघाडी शहर उपाध्यक्ष सौ. वैष्णवी मोंडकर यांची माहिती.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ समाजातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, विधवा महिलांसाठी विकास मालवण संस्था, मातृत्व वरदान फाऊंडेशनच्या माध्यमातून, मालवण पेट्रोलपंप नजिकच्या हॉटेल श्री महाराज मालवण येथे दिनांक ५ जून रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १०:३० ते सायंकाळी या वेळेत आयोजीत केले असून या शिबिरात उत्पन्न दाखला, वय अधिवास दाखला संदर्भात कागदपत्र पूर्ण भरून घेतले जाणार आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यावेळी शासनाच्या वतीने तलाठी व पोलीस पाटील उपलब्ध राहणार आहेत.

सदर योजनेस पात्र महिलांनी रेशन कार्ड, घरपत्रक उतारा, सातबारा, मतदान कार्ड, आधार कार्ड,पासपोट साईज फोटो शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र विवाहित असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट ,बँक पासबुक हे कागद घेऊन वरील वेळेत उपस्थित रहावे अशी माहिती सौ. वैष्णवी मोंडकर (भाजपा महिला उपाध्यक्ष, मालवण शहर)यांनी दिली आहे.

अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भय करणे, महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याचा असून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत सदर सादर करायचे आहेत. लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे असून वय २१ ते ६५ वर्षे असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थीचे बँक खाते आवश्यक आहे सदरं योजना विवाहित. घटस्फोटित, विधवा, परितक्त्या, निराधार महिलांसाठी शासन राबविणार आहे ज्यांचा वय अधिवास दाखल्या ऐवजी १५ वर्षा पूर्वीचे जन्म प्रमाण पत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड या पैकी एक पुरावा गृहीत धरला जाणार आहे. तसेच ज्या पात्र महिलेकडे २.५० लाख उत्पन्नाचा पुरावा नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना या दाखल्यासाठी सूट देण्यात आली आहे. तसेच वरील निकषात बसणाऱ्या महिला बरोबरच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील वरील निकषात बसल्यास लाभ मिळणार आहे .शहरातील जास्तीत जास्त महिलांनी तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या संपर्कातील महिलांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सौ वैष्णवी मोंडकर (उपाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी, मालवण शहर) तसेच अध्यक्ष विकास मालवण संस्था, मातृत्व वरदान फाऊंडेशन यांनी केले आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ समाजातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, विधवा महिलांसाठी विकास मालवण संस्था, मातृत्व वरदान फाऊंडेशनच्या माध्यमातून, मालवण पेट्रोलपंप नजिकच्या हॉटेल श्री महाराज मालवण येथे दिनांक ५ जून रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १०:३० ते सायंकाळी या वेळेत आयोजीत केले असून या शिबिरात उत्पन्न दाखला, वय अधिवास दाखला संदर्भात कागदपत्र पूर्ण भरून घेतले जाणार आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यावेळी शासनाच्या वतीने तलाठी व पोलीस पाटील उपलब्ध राहणार आहेत.

सदर योजनेस पात्र महिलांनी रेशन कार्ड, घरपत्रक उतारा, सातबारा, मतदान कार्ड, आधार कार्ड,पासपोट साईज फोटो शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र विवाहित असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट ,बँक पासबुक हे कागद घेऊन वरील वेळेत उपस्थित रहावे अशी माहिती सौ. वैष्णवी मोंडकर (भाजपा महिला उपाध्यक्ष, मालवण शहर)यांनी दिली आहे.

अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भय करणे, महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याचा असून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत सदर सादर करायचे आहेत. लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे असून वय २१ ते ६५ वर्षे असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थीचे बँक खाते आवश्यक आहे सदरं योजना विवाहित. घटस्फोटित, विधवा, परितक्त्या, निराधार महिलांसाठी शासन राबविणार आहे ज्यांचा वय अधिवास दाखल्या ऐवजी १५ वर्षा पूर्वीचे जन्म प्रमाण पत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड या पैकी एक पुरावा गृहीत धरला जाणार आहे. तसेच ज्या पात्र महिलेकडे २.५० लाख उत्पन्नाचा पुरावा नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना या दाखल्यासाठी सूट देण्यात आली आहे. तसेच वरील निकषात बसणाऱ्या महिला बरोबरच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील वरील निकषात बसल्यास लाभ मिळणार आहे .शहरातील जास्तीत जास्त महिलांनी तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या संपर्कातील महिलांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सौ वैष्णवी मोंडकर (उपाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी, मालवण शहर) तसेच अध्यक्ष विकास मालवण संस्था, मातृत्व वरदान फाऊंडेशन यांनी केले आहे

error: Content is protected !!