29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

चाफेड येथे गवारेड्याने नुकसान केलेल्या वायंगणी शेतीची, शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई..!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड पिंपळवाडी येथील ‘उंचावळा’ भागातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी वायंगणी शेतीचे गवा रेड्यानी अक्षरशः नासधूस करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याबाबत सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वनविभाग मार्फत रीतसर पंचनामा केला. यानंतर शेतकऱ्यांना सुमारे १८००० रू नुकसान भरपाई मिळाली. याबाबत आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने बातमी प्रसारीत केली होती.

यंदाच्या उन्हाळी हंगामात येथील शेतकरी प्रदीप महादेव घाडी, प्रकाश सखाराम पाटील, दीपक जयराम राणे, मंगेश कृष्णा साळकर आदी शेतकऱ्यांचे बागायतीचे गवा रेड्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याबाबत येथील शेतकऱ्यांनी सरपंच किरण मेस्त्री यांचे लक्ष वेधले असता सरपंच आणि पोलीस पाटील संतोष सावंत तसेच सबंधित वनविभागाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचयादी घातली. तसेच सरपंच यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार रुपये मिळाले. याबाबत शेतकऱ्यांनी सहकार्य केलेल्या सर्वांचे विशेष आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड पिंपळवाडी येथील 'उंचावळा' भागातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी वायंगणी शेतीचे गवा रेड्यानी अक्षरशः नासधूस करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याबाबत सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वनविभाग मार्फत रीतसर पंचनामा केला. यानंतर शेतकऱ्यांना सुमारे १८००० रू नुकसान भरपाई मिळाली. याबाबत आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने बातमी प्रसारीत केली होती.

यंदाच्या उन्हाळी हंगामात येथील शेतकरी प्रदीप महादेव घाडी, प्रकाश सखाराम पाटील, दीपक जयराम राणे, मंगेश कृष्णा साळकर आदी शेतकऱ्यांचे बागायतीचे गवा रेड्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याबाबत येथील शेतकऱ्यांनी सरपंच किरण मेस्त्री यांचे लक्ष वेधले असता सरपंच आणि पोलीस पाटील संतोष सावंत तसेच सबंधित वनविभागाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचयादी घातली. तसेच सरपंच यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार रुपये मिळाले. याबाबत शेतकऱ्यांनी सहकार्य केलेल्या सर्वांचे विशेष आभार मानले आहेत.

error: Content is protected !!