मुख्याध्यापक श्री. डि. जे. टकले आणि वनक्षेत्रपाल श्री. शिंदे यांनी केले मार्गदर्शन.
आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी येथे केंद्र सरकार च्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी, ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रम सुरु करण्यात आला. या निमित्त
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डि. जे. टकले म्हणाले की, अमर्याद वृक्ष तोडीने पर्यावरणाचा -हास होत आहे. यामुळे वाढत्या तपमानाचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी वनपाल श्री. प्रकाश शिंदे, रामेश्वर वाचनालय, आचरा यांचे कार्यवाह श्री. अर्जुन बापर्डेकर व शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमाबाबत माहिती दिली आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. यावेळी शाळेला वनक्षेत्रपाल श्री. शिंदे यांनी, दहा विविध प्रकारची झाडे भेट दिली.