आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात प्रतीवर्षी ‘साने गुरुजी कथामाला मालवण व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे’ , यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर आणि तालुकास्तर अशी भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित केले जाते. या वर्षीसाठी स्पर्धेतील अंतिम कथाकथन स्पर्धा २० नोव्हेंबर २०२४ रोजी, परम पूज्य प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे, ता. मालवण येथे संपन्न होणार आहे. मालवण तालुका कथामालेची सभा सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासभेत या माहितीच्या घोषणा करण्यात आल्या. या सभेला मार्गदर्शक म्हणून श्री. सुरेश ठाकुर यांच्यासह रामचंद्र कुबल, परशुराम गुरव, सायली परब, संजय परब, कामिनी ढेकणे. अमृता मांजरेकर, भवन मांजरेकर, मनाली फाटक आदी उपस्थित होते.
( गट अ – इयत्ता ३री, ४थी – कथा प्रकार : जीवन कथा. )
कथा विश्लेषण – साने गुरुजींचे जीवन प्रसंग निवेदक स्वतः सांगत आहे. किमान ते कमाल वेळ – ३ ते ४ मिनिटे
गट ब – इयत्ता ५वी, ६वी :कथा प्रकार – चरित्र प्रसंग कथा.
कथा विश्लेषण – दहा पैकी एका समाजसुधारकांच्या जीवनकार्यातील प्रसंग कथा. किमान ते कमाल वेळ – ४ ते ५ मिनिटे.
गट क – इयत्ता ७वी, ८वी – कथा प्रकार – संस्कार कथा.
कथा विश्लेषण – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा.
किमान ते कमाल वेळ – ५ ते ६ मिनिटे.
गट अ : जीवन कथा – साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील ४२ रात्रींपैकी कोणतीही एक रात्र निवेदकाने स्वतः कथनीय करून सादर करायची आहे. जशीच्या तशी नको आणा ती त्या वेळेत बसविणे ह्या अटी आहेत.
गट ब – चरित्र प्रसंग कथा -१) प. पू आप्पासाहेब पटवर्धन, २) नरेंद्र दाभोलकर, ३) डॉ अभय बंग, ४) डॉ .राणी बंग, ५) डॉ. प्रकाश आमटे, ६) डॉ. मंदाकिनी आमटे, ७) सिंधुताई सकपाळ, ८) समाजसेवक विनायक दामोदर सावरकर, ९) अण्णाभाऊ साठे, १०) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या दहा समाज सुधारकांपैकी एका समाजसुधारकांच्या जीवन कार्यातील प्रसंग कथा.
गट क : संस्कार कथा – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा; त्यातून लोकांचे प्रबोधन होईल.
अधिक माहिती साठी रामचंद्र एकनाथ कुबल ( ९४२०२१०८११) व सुगंधा केदार गुरव (९४२००७८५१९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण तालुका कथामालेतर्फे करण्यात आले आहे.