26 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पर्यटन व्यावसायिकांना मोफत विमान प्रवास ; फ्लाय 91 विमानसेवा व पर्यटन महासंघाच्या समन्वयाने बंगळुरू आणि हैद्राबाद येथील टूर ऑपरेटर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौरा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

पर्यटन व्यावसायिक महासंघाकडून पावसाळी पर्यटनासाठी प्रयत्न ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील असून प्रामुख्याने पावसाळी पर्यटन वाढीचा उद्धेश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि फ्लाय ९१ या विमान कंपनीच्या समन्वयाने बंगळुरू आणि हैद्राबाद येथील टूर्स ऑपरेटर यांचा पर्यटन अभ्यास दौरा संपन्न झाला. पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत व पर्यटन महासंघाचे सल्लागार श्री गुरु राणे यांच्या प्रमुखत्वाखाली हा अभ्यास दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटना बरोबर ऍग्रो, हिस्ट्री, मेडिकल, कल्चरल, हिल, फूड टुरिझम वाढीसाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांना देण्यात आली. बीच टुरिझम समवेतच ,सावंतवाडी येथील लाकडी खेळणी ), गंजिफा, आंबोली थंड हवेचे ठिकाण, वैभववाडीतील भीमाने बकासुराचा वध केलेली पांडवकालीन गुहा, जिल्ह्यातील गड किल्ले, मॅगग्रोव्हज सफर, जंगल सफर या सर्वां विषयी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांनी विशेष लक्ष केंद्रित करून पर्यटन व्यावसायिक महासंघा सोबत काम करून बंगळुरू आणि हैद्राबाद येथील पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी टुर आयोजित केले जाणार असून आलेल्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील त्या त्या भागातील हॉटेल रेस्टाॅरंट, रिक्षा चारचाकी, स्थानिक गाईड, व्यावसायिकांची माहिती संकलित करून देण्याचे काम पर्यटन महासंघाने चालू केले असून लवकरच ही माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांना दिली जाणार आहे. यासंबंधी श्री अवि सामंत यांच्या हॉटेल आदिज देवबाग याठिकाणी यासंदर्भात फ्लाय 91 विमानसेवा मार्केटीग अधिकारी श्री जोशी, पर्यटन महासंघ मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत, पर्यटन महासंघाचे सल्लागार श्री गुरुनाथ राणे व श्री सचिन गोवेकर तसेच अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांची बैठक झाली. यावेळी अभ्यास दौऱ्यावर आलेल्याचे स्वागत पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे करण्यात आले. यावेळी फ्लाय 91 विमानसेवा अधिकारी यांनी सांगितले की जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी हॉटेल पर्यटन व्यावसायिक बंगळुरू हैद्राबाद येथे फिरण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसंदर्भात आपल्या व्यवसायाच्या माहिती देण्यासाठी जात असतील तर कंपनीची सिंधुदुर्गातून बंगळुरु आणि हैदराबाद अशी उड्डाणे आता जी, बॅ. नाथ पै चिपी विमानतळा वरून नियमीत पणे सुरू आहेत त्या मध्ये पर्यटन महासंघाच्या सभासदांसाठी कंपनीने हैदराबाद आणि बंगळुरु या दोन्ही ठिकाणसाठी विमान प्रवासाची तिकिटे मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

कंपनीच्या या धोरणा अंतर्गत यंदाच्या वर्षी ३१ ॲागस्ट २०२४ या कालावधीत सिंधुदुर्गातील वरील मार्गावरच्या उड्डाणातील प्रत्येक विमानात जाता व येता दररोज १५ तिकीटे मोफत उपलब्ध करून दिली आहेत जाणार असून प्लाय ९१ ची सिंधुदुर्ग – बंगळुरु – सिंधुदुर्ग ही उड्डाणे सोमवार,बुधवार व शनिवारी असून हैद्राबाद साठी शुक्रवार व रविवार अशी विमानसेवा सुरू आहे. या मोफत तिकिटांसाठी इच्छूकांनी support@fly91.in किंवा Naimish.joshi@fly91.in या इमेलवर किंवा ९९०९०००३६३ या क्रमांकावर आपली माहिती पाठविण्याचे आवाहन केले तसेच याविषयी पर्यटन महासंघाचे प्रतिनिधी श्री अवि सामंत व श्री गुरुनाथ राणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पर्यटन व्यावसायिक महासंघाकडून पावसाळी पर्यटनासाठी प्रयत्न ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती.

'मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील असून प्रामुख्याने पावसाळी पर्यटन वाढीचा उद्धेश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि फ्लाय ९१ या विमान कंपनीच्या समन्वयाने बंगळुरू आणि हैद्राबाद येथील टूर्स ऑपरेटर यांचा पर्यटन अभ्यास दौरा संपन्न झाला. पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत व पर्यटन महासंघाचे सल्लागार श्री गुरु राणे यांच्या प्रमुखत्वाखाली हा अभ्यास दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटना बरोबर ऍग्रो, हिस्ट्री, मेडिकल, कल्चरल, हिल, फूड टुरिझम वाढीसाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांना देण्यात आली. बीच टुरिझम समवेतच ,सावंतवाडी येथील लाकडी खेळणी ), गंजिफा, आंबोली थंड हवेचे ठिकाण, वैभववाडीतील भीमाने बकासुराचा वध केलेली पांडवकालीन गुहा, जिल्ह्यातील गड किल्ले, मॅगग्रोव्हज सफर, जंगल सफर या सर्वां विषयी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांनी विशेष लक्ष केंद्रित करून पर्यटन व्यावसायिक महासंघा सोबत काम करून बंगळुरू आणि हैद्राबाद येथील पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी टुर आयोजित केले जाणार असून आलेल्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील त्या त्या भागातील हॉटेल रेस्टाॅरंट, रिक्षा चारचाकी, स्थानिक गाईड, व्यावसायिकांची माहिती संकलित करून देण्याचे काम पर्यटन महासंघाने चालू केले असून लवकरच ही माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांना दिली जाणार आहे. यासंबंधी श्री अवि सामंत यांच्या हॉटेल आदिज देवबाग याठिकाणी यासंदर्भात फ्लाय 91 विमानसेवा मार्केटीग अधिकारी श्री जोशी, पर्यटन महासंघ मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत, पर्यटन महासंघाचे सल्लागार श्री गुरुनाथ राणे व श्री सचिन गोवेकर तसेच अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांची बैठक झाली. यावेळी अभ्यास दौऱ्यावर आलेल्याचे स्वागत पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे करण्यात आले. यावेळी फ्लाय 91 विमानसेवा अधिकारी यांनी सांगितले की जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी हॉटेल पर्यटन व्यावसायिक बंगळुरू हैद्राबाद येथे फिरण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसंदर्भात आपल्या व्यवसायाच्या माहिती देण्यासाठी जात असतील तर कंपनीची सिंधुदुर्गातून बंगळुरु आणि हैदराबाद अशी उड्डाणे आता जी, बॅ. नाथ पै चिपी विमानतळा वरून नियमीत पणे सुरू आहेत त्या मध्ये पर्यटन महासंघाच्या सभासदांसाठी कंपनीने हैदराबाद आणि बंगळुरु या दोन्ही ठिकाणसाठी विमान प्रवासाची तिकिटे मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

कंपनीच्या या धोरणा अंतर्गत यंदाच्या वर्षी ३१ ॲागस्ट २०२४ या कालावधीत सिंधुदुर्गातील वरील मार्गावरच्या उड्डाणातील प्रत्येक विमानात जाता व येता दररोज १५ तिकीटे मोफत उपलब्ध करून दिली आहेत जाणार असून प्लाय ९१ ची सिंधुदुर्ग - बंगळुरु - सिंधुदुर्ग ही उड्डाणे सोमवार,बुधवार व शनिवारी असून हैद्राबाद साठी शुक्रवार व रविवार अशी विमानसेवा सुरू आहे. या मोफत तिकिटांसाठी इच्छूकांनी support@fly91.in किंवा Naimish.joshi@fly91.in या इमेलवर किंवा ९९०९०००३६३ या क्रमांकावर आपली माहिती पाठविण्याचे आवाहन केले तसेच याविषयी पर्यटन महासंघाचे प्रतिनिधी श्री अवि सामंत व श्री गुरुनाथ राणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे .

error: Content is protected !!