संस्थेच्या वतीने शिक्षकांचाही विशेष सत्कार ; प्रशालेने एस एस सी परीक्षा निकालात १००% यश केले आहे प्राप्त.
सिंधुदुर्ग | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ‘अंजुमन ई खुद्धामुल मुस्लिमीन हायस्कूल, हरकुळ बुद्रुक’ या प्रशालेतील, साल २०२४ सालच्या इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, येथील उर्दू हायस्कूल सभागृहात संपन्न झाला. संस्था अध्यक्ष श्री. शहानवाज ख़ान यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. संस्थेचे व प्रशालेचे हीतचिंतक व सामाजिक नेते श्री. अबिद नाईक व श्री. असिफ नाईक हे या गुणगौरव सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ प्रशालेच्या वतीने करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने शिक्षकांनाही या यशाबद्दल विशेष गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांकडून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नसरीन डांगे मॅडम यांच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी श्री. रईस पटेल (उर्दू हायस्कूल चेअरमन), श्री. खालिद नाईक, श्री. अब्बास शेख़, श्री. महंमद हनीफ पटेल ( कार्याध्यक्ष, हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई), श्री. अब्दुल करीम अल्लीशेख ( जनरल सेक्रेटरी ), श्री दीपक तांबे (सदस्य, हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ ), श्री. रियाज़ सलिमशा पटेल (सहकार्यवाह हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ मुंबई) श्री. हमीद पटेल, श्री नजीर पटेल ( माजी अध्यक्ष हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ ), श्री. सलीमशा पटेल साहेब, (ज्येष्ठ ग्रामस्थ), गावचे उपसरपंच श्री. आयुबशा पटेल , श्री. मुनावर पटेल, श्री. फियाज़ पटेल, निसार पटेल, अजीझ पटेल, अंजुमन हरकुळ शाखा कार्यालय चेअरमन लियाक़त पटेल, स्कूल कमिटी उपाध्यक्ष इमरान पटेल, सदस्य असिफ मुजावर, जेबा कुरेशी, मणचे गावचे सईद सोलकर, मुंबईतील सदस्य सलाम मुजावर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका फाहमिदा सर्गुरू, सद्दाम नाईक इत्यादी उपस्थित होते.
तसेच गावातील आणि मुंबईतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रशाले मधील विद्यार्थी अनुक्रमे प्रथम क्रमांक कु. तज़मीन शेख, ९६.२०%%, द्वितीय कु. माज शेख. ९५.८०%, तृतीय क्रमांक विभागून कु. जिद्दांन सोलकर ८५.६०%, आणि कु. सना खान ८५. ६० यांनी अव्वल यश प्राप्त केले असून शाळेचा निकालही १००% लागला आहे. यावेळी संस्था अध्यक्ष श्री. शहानवाज़ ख़ान यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या मेहनतीची प्रशंसा केली आणि भविष्यात देखील अशी प्रगती सुरु राहो अशा सर्वांना सदिच्छा दिल्या. यावेळी सर्व मान्यवरांनी गुणवंत मुलांचे अभिनंदन करत शुभेच्या दिल्या व मार्गदर्शन केले. शिक्षक, विद्यार्थी, पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे व सामाजिक नेते श्री. अबिद नाईक यांनी शाळेचे छप्पर व गडगा बांधणी यासाठी सहकार्य करायची हमी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डांगे सर यांनी केले तर हरकुळ बुद्रुक गांवचे भाषा तज्ञ श्री. हमीद पटेल शेरो शायरीचा माध्यमातून मान्यवरांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.