ब्यूरो न्यूज : अयोध्या मंदिरातील रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाटमधील सांगवेद महाविद्यालयाचे वरीष्ठ आचार्य होते. या विश्वविद्यालयाची स्थापना काशी नरेशच्या सहयोगाने केली गेली होती. आचार्य लक्ष्मीकांत यांची ‘यजुर्वेदातील मोठे पंडित’ अशी ओळख होती. प्रत्येक प्रकारच्या पूजा विधिमध्ये ते पारंगत होते. त्यांनी वेद आणि अनुष्ठानांची दीक्षा त्यांचे काका श्री गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून घेतली होती.
आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचे पूर्वज महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊर गांवचे रहिवाशी होते. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी काशीमध्ये स्थलांतर केलं होतं. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील लोकांनी श्रध्दांजली वाहिली आहे.
फोटो सौजन्य | नवी दिल्ली ब्यूरो