24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवण बंदर जेटीवर आर्मीच्या नियंत्रणाखाली योग दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणारे ‘एन सी सी ५८ महाराष्ट्र बटालियन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण, एन. सी. सी. विभाग’ यांच्या वतीने वर्षी साजरा झाला कार्यक्रम ; विविध प्रशासकीय अधिकार्यांची उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात बंदरजेटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. एन सी सी चे ५८ महाराष्ट्र बटालियन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एन. सी. सी. विभाग तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एन. एस एस. चे स्वयंसेवक यांच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात भारतीय आर्मीचे ऑफिसर तसेच एन. सी. सी. कमांडिंग ऑफिसर व विविध प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मालवण वासियांना आज २१ जूनला, किल्ले सिंधुदुर्गला साक्षी ठेवून व आर्मीच्या नियंत्रणाखाली हा भव्य योग दिन कार्यक्रम अनुभवता आली. कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, नायब तहसीलदार श्री. कोकरे, स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री कैलास राबते, छात्रसेना विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. योगशिक्षिका सिद्धिश्री माणगांवकर व केतकी सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र संपन्न झाले. आजच्या या योग दिन कार्यक्रमाचे हे सलग चौथे वर्ष ठरले.

या कार्यक्रमात प्रारंभी, स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय छात्रसेना विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांनी उपस्थित मान्यवरांचा परीचय करुन दिला व त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले. मानवी जीवनात योग साधनेचा फायदा हा शारिरीक व मानसीक तंदुरुस्तीसाठी महत्वाचा आहे असे प्रा. एम. आर. खोत यांनी स्पष्ट केले आणि मालवणात २१ जून हा योग दिन साजरा करताना, सर्वजण एक वेगळा उत्साह सर्वच जण अनुभवतील असा विश्वास व्यक्त केला.

यानंतर योगशिक्षिका सिद्धिश्री माणगांवकर यांनी प्रथम ओंकार ध्वनीचे उच्चारण करवून घेतले आणि गुरुवंदना सादर केली. त्यानंतर उभ्या व बैठक स्थितीत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. योगशिक्षिका सिद्धिश्री माणगांवकर यांनी या दरम्यान प्रत्येक आसनाची तंत्रशुद्ध पद्धत व महत्व समजावून सांगितले. यानंतर अनुलोम विलोमचे प्रात्यक्षिक झाले व कपालभातीची माहिती देण्यात आली. उपस्थित प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक वर्ग, एन. सी. सी. विद्यार्थी विद्यार्थिनी, कट्टा येथील वराडकर प्रशालेचे विद्यार्थी, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य, मालवण वासिय तसेच विविध राजकीय व सामाजिक प्रतिनिधी, डाॅक्टर्स, वकिल, व्यावसायिक या सर्वांनी या योग दिन कार्यक्रमातील योग प्रात्यक्षिकांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या समारोपाला लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांनी आरोग्य पसायदान सादर केले आणि या योग दिन कार्यक्रमातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि बंदरजेटीवर आयोजीत कार्यक्रमाला सहकार्य केलेल्या मालवण नगरपरिषद प्रशासन व उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमात कर्नल दीपक दयाल, ५८ महाराष्ट्र एन सी सी बटालियन कमांडिंग ऑफिसर सुभेदार मेजर दिनेश गेडाम, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, नायब तहसीलदार श्री. कोकरे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबते, लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी वृंद, एन सी सी व एन एस एस चे स्वयंसेवक आणि एच एम गुरुजीवन सिंग, शाहू सर, सुभेदार चंद्रसिंग, पूर्णचंद्र बेहरा, नरेशकुमार तसेच डाॅ. राहुल पंतवालालकर व लायन्स व रोटरी क्लब ऑफ मालवणचे सदस्य, ऐलमा पैलमा अक्षरदेवा महिला साहित्यिक समूहाच्या संस्थापक वैशाली पंडित, मातृत्व आधार फाऊंडेशनचे पदाधिकारी दादा वेंगुर्लेकर, माय माऊली संस्थेच्या संस्थापक फॅनी फर्नांडिस व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते नंदू देसाई, किसन मांजरेकर, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सौ. सविता सुनील देऊलकर तसेच व्यायाम व आरोग्य संस्थांचे सदस्य व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक आणि मालवणचे नागरीक उपस्थित होते.

ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग, मालवणचा मनोहारी समुद्र किनारा आणि भारतीय आर्मी ऑफिसर व एन सी सी कमांडिंग ऑफिसर साथीने योग साधनेची प्रात्यक्षिके करुन हा आरोग्य निरामयता कार्यक्रम अनुभवता आला. या विशेष कार्यक्रमाची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणारे 'एन सी सी ५८ महाराष्ट्र बटालियन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण, एन. सी. सी. विभाग' यांच्या वतीने वर्षी साजरा झाला कार्यक्रम ; विविध प्रशासकीय अधिकार्यांची उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात बंदरजेटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. एन सी सी चे ५८ महाराष्ट्र बटालियन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एन. सी. सी. विभाग तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एन. एस एस. चे स्वयंसेवक यांच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात भारतीय आर्मीचे ऑफिसर तसेच एन. सी. सी. कमांडिंग ऑफिसर व विविध प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मालवण वासियांना आज २१ जूनला, किल्ले सिंधुदुर्गला साक्षी ठेवून व आर्मीच्या नियंत्रणाखाली हा भव्य योग दिन कार्यक्रम अनुभवता आली. कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, नायब तहसीलदार श्री. कोकरे, स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री कैलास राबते, छात्रसेना विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. योगशिक्षिका सिद्धिश्री माणगांवकर व केतकी सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र संपन्न झाले. आजच्या या योग दिन कार्यक्रमाचे हे सलग चौथे वर्ष ठरले.

या कार्यक्रमात प्रारंभी, स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय छात्रसेना विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांनी उपस्थित मान्यवरांचा परीचय करुन दिला व त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले. मानवी जीवनात योग साधनेचा फायदा हा शारिरीक व मानसीक तंदुरुस्तीसाठी महत्वाचा आहे असे प्रा. एम. आर. खोत यांनी स्पष्ट केले आणि मालवणात २१ जून हा योग दिन साजरा करताना, सर्वजण एक वेगळा उत्साह सर्वच जण अनुभवतील असा विश्वास व्यक्त केला.

यानंतर योगशिक्षिका सिद्धिश्री माणगांवकर यांनी प्रथम ओंकार ध्वनीचे उच्चारण करवून घेतले आणि गुरुवंदना सादर केली. त्यानंतर उभ्या व बैठक स्थितीत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. योगशिक्षिका सिद्धिश्री माणगांवकर यांनी या दरम्यान प्रत्येक आसनाची तंत्रशुद्ध पद्धत व महत्व समजावून सांगितले. यानंतर अनुलोम विलोमचे प्रात्यक्षिक झाले व कपालभातीची माहिती देण्यात आली. उपस्थित प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक वर्ग, एन. सी. सी. विद्यार्थी विद्यार्थिनी, कट्टा येथील वराडकर प्रशालेचे विद्यार्थी, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य, मालवण वासिय तसेच विविध राजकीय व सामाजिक प्रतिनिधी, डाॅक्टर्स, वकिल, व्यावसायिक या सर्वांनी या योग दिन कार्यक्रमातील योग प्रात्यक्षिकांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या समारोपाला लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांनी आरोग्य पसायदान सादर केले आणि या योग दिन कार्यक्रमातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि बंदरजेटीवर आयोजीत कार्यक्रमाला सहकार्य केलेल्या मालवण नगरपरिषद प्रशासन व उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमात कर्नल दीपक दयाल, ५८ महाराष्ट्र एन सी सी बटालियन कमांडिंग ऑफिसर सुभेदार मेजर दिनेश गेडाम, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, नायब तहसीलदार श्री. कोकरे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबते, लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी वृंद, एन सी सी व एन एस एस चे स्वयंसेवक आणि एच एम गुरुजीवन सिंग, शाहू सर, सुभेदार चंद्रसिंग, पूर्णचंद्र बेहरा, नरेशकुमार तसेच डाॅ. राहुल पंतवालालकर व लायन्स व रोटरी क्लब ऑफ मालवणचे सदस्य, ऐलमा पैलमा अक्षरदेवा महिला साहित्यिक समूहाच्या संस्थापक वैशाली पंडित, मातृत्व आधार फाऊंडेशनचे पदाधिकारी दादा वेंगुर्लेकर, माय माऊली संस्थेच्या संस्थापक फॅनी फर्नांडिस व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते नंदू देसाई, किसन मांजरेकर, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सौ. सविता सुनील देऊलकर तसेच व्यायाम व आरोग्य संस्थांचे सदस्य व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक आणि मालवणचे नागरीक उपस्थित होते.

ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग, मालवणचा मनोहारी समुद्र किनारा आणि भारतीय आर्मी ऑफिसर व एन सी सी कमांडिंग ऑफिसर साथीने योग साधनेची प्रात्यक्षिके करुन हा आरोग्य निरामयता कार्यक्रम अनुभवता आला. या विशेष कार्यक्रमाची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!