28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

आता पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार ‘आयुष्मान कार्ड…!’

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्यूरो न्यूज : आतापर्यंत केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आयुष्मान योजनेच्या लाभार्थी घटकामध्ये पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. या साठी त्यांना त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागणार आहे.

केंद्र सरकारकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. योजनेचा केसरी, पिवळ्या रेशनकार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्यूरो न्यूज : आतापर्यंत केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आयुष्मान योजनेच्या लाभार्थी घटकामध्ये पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. या साठी त्यांना त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागणार आहे.

केंद्र सरकारकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. योजनेचा केसरी, पिवळ्या रेशनकार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.

error: Content is protected !!