कलमठ वासियांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.
कणकवली | उमेश परब : कणकवली कलमठ मध्ये संदिप मेस्त्री मित्रमंडळ ळाच्या वतीने दिवाळी निमित्त अनेक स्पर्धाचे आयोजन केले होते या दिवाळी निमित्तच्या विविध स्पर्धामध्ये कलमठ वासियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नरकासुर स्पर्धेसाठी ८ मंडळानी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांक इसवटी मित्रमंडळ कोष्टीवाड़ी ,द्वितीय शिवतेजा बाजारपेठ, तृतीय पिंपळपार सुतारवाड़ी तर उत्तेजनार्थ म्हणून गोरक्षनाथ गोसावीवाड़ी, ओंकार बाजारपेठ, जय हुनमान गावड़ेवाड़ी यांची निवड झाली, अंगण रांगोळी स्पर्धेत प्रथम ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यामध्ये प्रथम क्रमांक अंकिता चिंदरकर ,द्वितीय तेजस्वी कळसुलकर, तृतीय मंगल पेडणेकर तर उत्तेजनार्थ म्हणून दीक्षा नांदगांवकर, वैदेही गुरव यांनी यश संपादन केले. “कलमठ किल्लेदार” स्पर्धेसाठी १७ मंडळ व वैयक्तिक स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यामध्ये प्रतापगडची प्रतिकृति साकारलेल्या प्रथमेश व कमलेश कळसुकर यानी प्रथम, सुवर्णगड साकारलेल्या पिंपळपार मित्रमंडळ सुतारवाड़ी ,तृतीय अखिल आजगांवकर यांनी साकारलेल्या रांगणागड़ किल्ल्याला तर उत्तेजनार्थ ओंकार मित्रमंडळ बाजारपेठला गौरवीण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण नरकासुर स्पर्धेसाठी प्रसिद्ध मूर्तिकार समीर गुरव तर किल्ले आणि रांगोळी साठि कला दिग्दर्शक रविकिरण शिरवलकर यांनी केले.
सहभागी सर्व स्पर्धकाना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नरकासुर स्पर्धेच्या बक्षीस वितरणसाठि पंस सदस्य मिलिंद मेस्त्री,स्वप्निल चिंदरकर, सुरेश वर्देकर ,अनंत हजारे, गिरिश धुमाळे, तनोज कळसुलकर, नीळकंठ हजारे ,सुनील रेपाळ, जगदीश राउत, आबा मेस्त्री उपस्थित होते तर रांगोळी व गड़ किल्ले स्पर्धेतील विजेत्यांच्या घरी जाऊन रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेचे आयोजक संदीप मेस्त्री, गुरु वर्देकर, गणेश तळगांवकर, समीर कवठणकर,अमेय मडव, विनय खोचरे,परेश कांबळी,प्रबोधन मठकर, बाबु हिंदळेकर,शिवम धानजी, धीरज मेस्त्री, प्रथमेश कळसुलकर उपस्थित होते.
सहभागी मंडळ व स्पर्धकानी संधी उपलब्ध करून व्यासपीठ मीळवून दिल्या बद्दल संदिप मेस्त्री मित्रमंडळला धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले.