प्रतिनिधी : मंत्री नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल समाजसेवक तथा मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशद्वारे अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रसिद्धी संदेशात श्रीकांत सावंत म्हणतात की, पर्यटनाच्या दृष्टीने आता कोकणातील सर्व बंदरांचा अलिबाग जवळील मांडवा बंदरा प्रमाणे मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास होणारच हे निश्चित आहे. मंत्री नितेश राणे यांचे व्हिजन नेहमीच सकारात्मक प्रगतीचे राहीले असून त्यांचे हे मंत्रीपद म्हणजे त्यांच्या अथक कार्यक्षमतेची पोचपावती आहे. नितेश राणे हे कुठल्याही पदावर किंवा मंत्रीपदावर समाधान मानून शांत बसणारे व्यक्तिमत्व नसून ते स्वतःला व कोकणातील जनतेला उत्तरोत्तर विकासाचे आयाम गाठत नेतील अशा सदिच्छा मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत श्रीकांत सावंत यांनी दिल्या असून मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रीपदाच्या रुपाने कोकणच्या जनतेचा खूप मोठा सन्मान झाल्याचेही मत व्यक्त केले आहे.