साळशी हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
शिरगांव | प्रतिनिधी ( संतोष साळसकर) : या शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा श्रेत्रातही नावलौकिक मिळावावे. या शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असून शाळेची प्रगती हेच आमचे ध्येय आहे. प्रतिपादन साळशी गावचे सुपुत्र तथा शिक्षणप्रेमी किशोर लाड यांनी साळशी हायस्कूल येथे बोलताना व्यक्त केले. माध्यमिक विद्यामंदिर साळशी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कमेची बक्षीस आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. ही बक्षीसे चंद्रकांत पारधी व अनिल व विजय यांनी दिली होती. तसेच या वर्षी सन २०२४-२५ चा आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार तनिषा संजय गावकर हिला देण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील नेत्रदीपक यश संपादन कैलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली सुतार, संस्थाध्यक्ष सत्यवान सावंत, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले, विजय गावकर, यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमात सरपंच सौ. वैशाली सुतार, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, संस्थेचे अध्यक्ष सत्यवान सावंत, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले, शिक्षण प्रेमी किशोर लाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावकर, माजी पं. स. सदस्य सुनील गावकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, सुनील लाड, विजय सुतार, विद्या गावकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी केली.अहवाल वाचन संजय मराठे यानी केले. यावेळी विजय गावकर यांनी २५००० रुपये रक्कम संस्थेकडे देऊन त्याचे जे काही व्याज येईल त्यातून ई. १० वीत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे द्यावीत असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम तर आभार स्वप्नील भरणकर यांनी केले.
वार्षिक स्नेहसंमेलनात मुलांचे विविध गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम सदर झाले. यावेळी पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.