25.2 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

रोझरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूलचे २०२४ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात १३ डिसेंबर रोजी संपन्न झाले. यंदा या सोहळ्यात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेचे फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या प्रमुख आयोजन मार्गदर्शनाखाली शारीरिक कवायत प्रात्यक्षिके तथा पि टी डिस्प्ले कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रमाला मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मालवण पोलिस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे तर मान्यवर फादर अमृत फाॅन्सेका व फादर ऑल्वीन फर्नांडिस यांच्यासह मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहूणे पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे म्हणाले की खेळाचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्यासाठी खेळ व खेळासाठी आरोग्य हा समन्वय साधला पाहिजे. खेळाने निरोगी जीवनशैली विकसीत होते व निरोगी जीवनशैली यशस्वी माणसांचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यास व खेळ यांचा शिक्षक व पालक यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय साधत प्रगती करावी.
मंचावरील अन्य मान्यवरांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळाची महती आपल्या भाषणातून व्यक्त केली.

या सोहळ्यात प्रशालेचे फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रार्थना नृत्य, ध्वज नृत्य, काठी नृत्य, सूर्यफूल नृत्य, टोपी नृत्य, दंड नृत्य, डंबेल्स, ॲरोबीक्स, छत्री नृत्य, चेंडू नृत्य, कागदी पंखा नृत्य, बंटींग, ग्लोव्हज ॲन्ड कॅप नृत्य, पंख नृत्य, लेझीम, योगा आणि विविध नृत्य प्रकार सादर झाले व नाताळ नाटिका सादर झाली. स्नेहसंमेलनातील खाऊ व खेळाच्या स्टाॅल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिक्षिका डायना डिसोजा व महिमा लोकेगांवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शिक्षिका स्वाती हळदणकर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी केले.

या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे, फादर ऑल्वीन फाॅन्सेका, मुख्याध्यापक फादर ऑल्वीन फर्नांडिस आणि प्रशालेचे शिक्षकवृंद, सिस्टर वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व मालवणवासी उपस्थित होते

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!