26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

सामंजस्य करारावर सह्या ; युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण राबवणार निसर्ग विषयक अभ्यासासाठी एकत्रित उपक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्यातील एका सामंजस्य करारावर १३ जून रोजी सह्या झाल्या. निसर्ग, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या उद्देशाने या दोन्ही संस्था एकत्रित उपक्रम राबविणार आहेत. युथ बिट्सच्या वतीने अध्यक्ष स्वाती पारकर आणि महाविद्यालयाच्या वतीने एनएसएस प्रोग्राम ऑफिसर, झूलाॅजी विभागप्रमुख आणि भूगोल विभागप्रमुख हे ‘पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट’ असणार आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत १५ जून पासून निसर्गशाळा ह्या उपक्रमाची देखील सुरुवात होणार आहे.

निसर्गशाळा या उपक्रमात निसर्ग विषयक अभ्यास, पाण्याच्या स्रोतांची माहिती, प्राणी पक्षी यांची ओळख व माहिती, समुद्र किनार्याची अभ्यासपूर्ण सफर, पारंपरिक मासेमारीची माहिती, आकाश दर्शन, ॠतूंच्या सोहळ्यांचा अनुभव अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्यातील एका सामंजस्य करारावर १३ जून रोजी सह्या झाल्या. निसर्ग, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या उद्देशाने या दोन्ही संस्था एकत्रित उपक्रम राबविणार आहेत. युथ बिट्सच्या वतीने अध्यक्ष स्वाती पारकर आणि महाविद्यालयाच्या वतीने एनएसएस प्रोग्राम ऑफिसर, झूलाॅजी विभागप्रमुख आणि भूगोल विभागप्रमुख हे 'पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट' असणार आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत १५ जून पासून निसर्गशाळा ह्या उपक्रमाची देखील सुरुवात होणार आहे.

निसर्गशाळा या उपक्रमात निसर्ग विषयक अभ्यास, पाण्याच्या स्रोतांची माहिती, प्राणी पक्षी यांची ओळख व माहिती, समुद्र किनार्याची अभ्यासपूर्ण सफर, पारंपरिक मासेमारीची माहिती, आकाश दर्शन, ॠतूंच्या सोहळ्यांचा अनुभव अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

error: Content is protected !!