मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सुरेश प्रभू यांना दिल्या शुभेच्छा व केले अभिनंदन.
मालवण | प्रतिनिधी : दुबईतल्या अल जद्दाह येथे, २८ सप्टेंबर रोजी, मेरीयट हाॅटेलमध्ये संपन्न होणार्या ‘इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् ‘ या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती हा समस्त कोकणवासियांचा व भारतीयांचा गौरव आहे आणि त्यासाठी त्यांचे मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदन करत आहोत असे मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे.
श्री श्रीकांत सावंत.( संस्थापक अध्यक्ष, मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद.)
मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात नमूद केले की माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे सध्या रिषीहूड युनिव्हर्सिटीचे चान्सलर म्हणून कार्यरत आहेत व त्यासह त्यांचा संसदपटू म्हणून दांडगा राजकीय अनुभव, आर्थिक व औद्योगिक ध्येय धोरणे निश्चितीमध्ये असलेला त्यांचा हातखंडा, कायद्याचा व संविधानाचा अभ्यास आणि इतर देशांतील व्यवहार व व्यापार यांचा त्यांच्याकडे असलेला अनुभव हा आगामी काळात कोकणातील युवा वर्गासाठी उपयुक्त ठरणार आहे. नुकतीच त्यांची जागतिक कृषी मंचावर नियुक्ती झालेली असल्याने या इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् सोहळ्यामध्ये सुरेश प्रभू यांचे विचार ऐकणे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते व जाणकार यांच्यासाठी उत्सुकतेचा विषय आहे असेही मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी विशेष नमूद केले आहे.
लवकरच मानवता विकास परीषदेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोकणातील रोजगार वाढ व विकास यासाठी आपण चर्चा करणार आहोत असे सांगितले आहे. कोकणात, शिक्षण, जलसंधारण, कृषी, रोजगार आर्थिक व दळण वळण विकासा संदर्भात ठोस ध्येय धोरणांचा आपण पाठपुरावा करायला सुरेशजी प्रभू यांचा अनुभव, अभ्यास आणि भूमिका महत्वाची ठरेल असे श्रीकांत सावंत यांनी संदेशात सांगितले आहे.