26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्गातून प्रथमतः आमदार वैभव नाईक आज उमेदवारी अर्ज करणार दाखल.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्गातून प्रथमतः आज गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्गातून प्रथमतः आज गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!