26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

भाजपा नेते निलेश राणे यांनी तळाशील येथील बेपत्ता मच्छिमार किशोर चोडणेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत दिला धीर.

- Advertisement -
- Advertisement -

बेपत्ता मच्छिमार श्री. किशोर चोडणेकर यांच्या शोधकार्याचाही घेतला आढावा.

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेले मच्छिमार बांधव श्री. किशोर महादेव चोडणेकर यांच्या कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. बेपत्ता मच्छिमार शोध कार्याबाबत प्रशासनाकडून सूरू असलेल्या शोध कार्याचा आढावाही श्री निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून घेतला. यावेळी नेते निलेश राणे यांच्यासोबत भाजप पदाधिकारी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, राजन गांवकर, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, संजय तारी, अण्णा कोचरेकर यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर हे त्यांचा १४ वर्षांचा मुलगा कु. लावण्य किशोर चोडणेकर आणि सहकारी खलाशी धोंडीराज परब तारकर्ली यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन शनिवारी रात्री मासेमारीसाठी गेले होते. यावेळी अचानक वाढलेल्या वाऱ्या व पावसात होडी उलटली. तीनही जण पाण्यात बुडाले होते. पैकी कु. लावण्य हा धैर्याने पोहत बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह रविवारी सापडला. मात्र श्री. किशोर चोडणेकर यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यांचा शोध घ्यायचे अथक प्रयत्न ग्रामस्थ, प्रशासनान व शोध पथकाच्या माध्यमातून सूरू आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बेपत्ता मच्छिमार श्री. किशोर चोडणेकर यांच्या शोधकार्याचाही घेतला आढावा.

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेले मच्छिमार बांधव श्री. किशोर महादेव चोडणेकर यांच्या कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. बेपत्ता मच्छिमार शोध कार्याबाबत प्रशासनाकडून सूरू असलेल्या शोध कार्याचा आढावाही श्री निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून घेतला. यावेळी नेते निलेश राणे यांच्यासोबत भाजप पदाधिकारी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, राजन गांवकर, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, संजय तारी, अण्णा कोचरेकर यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर हे त्यांचा १४ वर्षांचा मुलगा कु. लावण्य किशोर चोडणेकर आणि सहकारी खलाशी धोंडीराज परब तारकर्ली यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन शनिवारी रात्री मासेमारीसाठी गेले होते. यावेळी अचानक वाढलेल्या वाऱ्या व पावसात होडी उलटली. तीनही जण पाण्यात बुडाले होते. पैकी कु. लावण्य हा धैर्याने पोहत बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह रविवारी सापडला. मात्र श्री. किशोर चोडणेकर यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यांचा शोध घ्यायचे अथक प्रयत्न ग्रामस्थ, प्रशासनान व शोध पथकाच्या माध्यमातून सूरू आहे.

error: Content is protected !!