24.4 C
Mālvan
Monday, November 25, 2024
IMG-20240531-WA0007

माननीय खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन शहर विकासासाठी यंत्रणेला पुढील आदेश द्यायची विनंती करणार : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.

- Advertisement -
- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत माजी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचे प्रशासकांबाबत मवाळ धोरण यामुळे पक्षाचे मताधिक्य घटल्याचीही केली टीका.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घटलेल्या मताधिक्यासाठी माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या मवाळ धोरणाला कारणीभूत ठरवले आहे.

काल १० जून रोजी दिलेल्या एका प्रसिद्धी पत्राद्वारे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी, गेली अडिच वर्षे आपण नगरपरिषद प्रशासकांच्या शहरातील विकासकामांबाबतच्या अनास्थेबद्दल व मनमानी कारभाराबाबत, शिवसेना उ. बा. ठा. पक्षाचा माजी नगराध्यक्ष या जबाबदारीने व सातत्याने शहरातिल विकास कामांबाबत भूमिका जाहीर करत होतो असे सांगितले असून त्याकडे सन्माननीय माजी खासदार व विद्यमान आमदार यांनी गांभिर्याने पाहिले नाही असे मत व्यक्त केले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान, शहरातील स्वच्छता, आरोग्य अशा विविध मुद्द्यांबाबत आपण यांनी वेळोवेळी लक्ष वेधले होते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे की नगरपरिषद प्रशासकांना मालवण शहरातल्या विकासाशी काही देणे घेणे नाही. प्रशासकांच्या या कारभाराबाबत, माननीय खासदार नारायण राणे यांची आपण भेट घेणार असून त्यांनी मालवण शहरातल्या रखडलेल्या विकास कामांबाबत व नगरपरिषदेच्या सक्षमतेबाबत यंत्रणेला पुढील आदेश द्यावेत अशी विनंती करणार असल्याचेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

लोकसभा निवडणुकीत माजी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचे प्रशासकांबाबत मवाळ धोरण यामुळे पक्षाचे मताधिक्य घटल्याचीही केली टीका.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घटलेल्या मताधिक्यासाठी माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या मवाळ धोरणाला कारणीभूत ठरवले आहे.

काल १० जून रोजी दिलेल्या एका प्रसिद्धी पत्राद्वारे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी, गेली अडिच वर्षे आपण नगरपरिषद प्रशासकांच्या शहरातील विकासकामांबाबतच्या अनास्थेबद्दल व मनमानी कारभाराबाबत, शिवसेना उ. बा. ठा. पक्षाचा माजी नगराध्यक्ष या जबाबदारीने व सातत्याने शहरातिल विकास कामांबाबत भूमिका जाहीर करत होतो असे सांगितले असून त्याकडे सन्माननीय माजी खासदार व विद्यमान आमदार यांनी गांभिर्याने पाहिले नाही असे मत व्यक्त केले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान, शहरातील स्वच्छता, आरोग्य अशा विविध मुद्द्यांबाबत आपण यांनी वेळोवेळी लक्ष वेधले होते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे की नगरपरिषद प्रशासकांना मालवण शहरातल्या विकासाशी काही देणे घेणे नाही. प्रशासकांच्या या कारभाराबाबत, माननीय खासदार नारायण राणे यांची आपण भेट घेणार असून त्यांनी मालवण शहरातल्या रखडलेल्या विकास कामांबाबत व नगरपरिषदेच्या सक्षमतेबाबत यंत्रणेला पुढील आदेश द्यावेत अशी विनंती करणार असल्याचेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

error: Content is protected !!