26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

शिक्षक परीषद मार्फत लाक्षणिक धरणे आंदोलन.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शाखा सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग समोर आज १० जून रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावेत अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.

सिंजिप/शिक्षण/प्राथ/आस्था-२/५१६४ या शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या १३/०२/२०२४ पत्रानुसार गणित व विज्ञान पदवीप्राप्त उपशिक्षकांना पदवीधर शिक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी अंतिम सेवाजेष्टता यादीतील उपशिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले असून अद्याप त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. ही रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी. विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे तीही राबविण्यात यावी. इतर जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदलीस पात्र उमेदवारांना त्या त्या जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा परिषदेनेही पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करावे. आंतरजिल्हा बदलीने स्व जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांची भविष्य निर्वाह निधी रक्कम अद्याप त्यांच्या खाती वर्ग करण्यात आलेली नाही ती लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी रक्कम शिक्षकांच्या खाती वर्ग करणे. या प्रमुख मागाण्यांसाठी सदर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. वरील मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले.

या धरणे आंदोलनास गणेश नाईक, निंगोजी कोकितकर, सुनिल करडे, रुपेश परब, प्रणिता भोयर, रुपेशकुमार गुंजाळ, आनंद तांबे, वल्लभनाथ प्रभू, सरिता परब यांनी सहभाग घेतला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शाखा सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग समोर आज १० जून रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावेत अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.

सिंजिप/शिक्षण/प्राथ/आस्था-२/५१६४ या शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या १३/०२/२०२४ पत्रानुसार गणित व विज्ञान पदवीप्राप्त उपशिक्षकांना पदवीधर शिक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी अंतिम सेवाजेष्टता यादीतील उपशिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले असून अद्याप त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. ही रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी. विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे तीही राबविण्यात यावी. इतर जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदलीस पात्र उमेदवारांना त्या त्या जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा परिषदेनेही पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करावे. आंतरजिल्हा बदलीने स्व जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांची भविष्य निर्वाह निधी रक्कम अद्याप त्यांच्या खाती वर्ग करण्यात आलेली नाही ती लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी रक्कम शिक्षकांच्या खाती वर्ग करणे. या प्रमुख मागाण्यांसाठी सदर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. वरील मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले.

या धरणे आंदोलनास गणेश नाईक, निंगोजी कोकितकर, सुनिल करडे, रुपेश परब, प्रणिता भोयर, रुपेशकुमार गुंजाळ, आनंद तांबे, वल्लभनाथ प्रभू, सरिता परब यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!