मुंबई | ब्यूरो न्यूज : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री. नारायण राणे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी, लोकसभा निवडणूक २०२४ साठी सहकार्य केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार व्यक्त केले. लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सभेत खासदार नारायण राणे यांना खासदारकीसाठी पाठिंबा दर्शवला होता.
यावेळी सौ. शर्मिलाताई ठाकरे, आमदार नितेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.