26.5 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

तळेरे येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त औषधी व मसाला वनस्पतींचे वृक्षारोपण.

- Advertisement -
- Advertisement -

निसर्ग मित्र, पत्रकार मित्रपरिवार आणि प्रज्ञांगण यांचा उपक्रम.

तळेरे | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निसर्ग मित्र परिवार, पत्रकार मित्र परिवार व प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी ५ जून रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ च्या परिसरात औषधी वनस्पती व मसाल्याच्या पदार्थाचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी तळेरे पंचक्रोशीतील विविध शाळेत ‘ग्रीन स्कूलची संकल्पना’ सत्यात आणण्यासाठी तळेरे निसर्गमित्र परिवार व तळेरेतील इतर स्वंयसेवी संस्थांच्या सहकार्याने एक नावीन्यपूर्ण उपक्रम घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या शाळेच्या विद्यार्थिनी कु प्रेक्षा दिपक नांदलस्कर व कु. रिध्दी राजेश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. यामध्ये काही औषधी वनस्पती तर तमालपत्र, लवंग, दालचिनी, जायफळ, ओवा, कढीपत्ता या मसाल्याच्या वनस्पतीं सोबतच जांभुळ, शेवगा या वनस्पतीची लागवड करण्यात आली.

यावेळी स्व. सुनील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, निसर्ग मित्र परिवाराचे माजी अध्यक्ष दादासाहेब महाडिक, तळेरे गावचे उपसरपंच शैलैश सुर्वे, माजी उपसरपंच दिपक नांदलस्कर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय मारकड, सचिव राजेश जाधव, माजी सरपंच शशांक तळेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुदवडकर, प्रज्ञांगणचे संस्थापक सतिश मदभावे, मयुर चव्हाण यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार व संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळेरेतील निसर्ग मित्र परिवाराला ५० झाडांची भेट दिली. त्यापैकी तळेरे नं. १ शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मसाल्याची व औषधी वनस्पतीची झाडे लावून शुभारंभ करण्यात आला.

शालेय परिसरात मसाल्याच्या आणि औषधी वनस्पतीच्या वृक्षारोपण बाबत माहिती देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव म्हणाले की, शालेय पोषण आहारात लागणारे विविध मसाल्याचे पदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना तोंड ओळख होईल हा मुख्य हेतु ठेऊन शाळा परिसरात विशेषत: मसाले आणि औषधी वनस्पतींची लागवड करून जोपासना करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

याप्रसंगी तळेरे पंचक्रोशीतील विविध शाळेत ‘ग्रीन स्कूलची संकल्पना’ सत्यात आणण्यासाठी तळेरे निसर्गमित्र परिवार व तळेरेतील इतर स्वंयसेवी संस्थांच्या सहकार्याने लवकरच एक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती सतिश मदभावे, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकड यांनी याप्रसंगी दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

निसर्ग मित्र, पत्रकार मित्रपरिवार आणि प्रज्ञांगण यांचा उपक्रम.

तळेरे | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निसर्ग मित्र परिवार, पत्रकार मित्र परिवार व प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी ५ जून रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ च्या परिसरात औषधी वनस्पती व मसाल्याच्या पदार्थाचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी तळेरे पंचक्रोशीतील विविध शाळेत 'ग्रीन स्कूलची संकल्पना' सत्यात आणण्यासाठी तळेरे निसर्गमित्र परिवार व तळेरेतील इतर स्वंयसेवी संस्थांच्या सहकार्याने एक नावीन्यपूर्ण उपक्रम घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या शाळेच्या विद्यार्थिनी कु प्रेक्षा दिपक नांदलस्कर व कु. रिध्दी राजेश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. यामध्ये काही औषधी वनस्पती तर तमालपत्र, लवंग, दालचिनी, जायफळ, ओवा, कढीपत्ता या मसाल्याच्या वनस्पतीं सोबतच जांभुळ, शेवगा या वनस्पतीची लागवड करण्यात आली.

यावेळी स्व. सुनील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, निसर्ग मित्र परिवाराचे माजी अध्यक्ष दादासाहेब महाडिक, तळेरे गावचे उपसरपंच शैलैश सुर्वे, माजी उपसरपंच दिपक नांदलस्कर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय मारकड, सचिव राजेश जाधव, माजी सरपंच शशांक तळेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुदवडकर, प्रज्ञांगणचे संस्थापक सतिश मदभावे, मयुर चव्हाण यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार व संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळेरेतील निसर्ग मित्र परिवाराला ५० झाडांची भेट दिली. त्यापैकी तळेरे नं. १ शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मसाल्याची व औषधी वनस्पतीची झाडे लावून शुभारंभ करण्यात आला.

शालेय परिसरात मसाल्याच्या आणि औषधी वनस्पतीच्या वृक्षारोपण बाबत माहिती देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव म्हणाले की, शालेय पोषण आहारात लागणारे विविध मसाल्याचे पदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना तोंड ओळख होईल हा मुख्य हेतु ठेऊन शाळा परिसरात विशेषत: मसाले आणि औषधी वनस्पतींची लागवड करून जोपासना करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

याप्रसंगी तळेरे पंचक्रोशीतील विविध शाळेत 'ग्रीन स्कूलची संकल्पना' सत्यात आणण्यासाठी तळेरे निसर्गमित्र परिवार व तळेरेतील इतर स्वंयसेवी संस्थांच्या सहकार्याने लवकरच एक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती सतिश मदभावे, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकड यांनी याप्रसंगी दिली.

error: Content is protected !!