बांदा | राकेश परब : हंसापूर – पेडणे येथे रविवार ७ नोव्हेंबर रोजी खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातेरी कलामंदिर या कला व सांस्कृतिक संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे सायंकाळी ७.३० वा उद्घाटन होईल. त्यानंतर खुली एकेरी नृत्य स्पर्धा (वयोगट १२ वर्षांवरील खुली)होणार आहे.
या स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश मूल्य ठेवण्यात आले आहे. प्रथम परितोषिक ५ हजार रुपये व प्रशस्तिपत्र, द्वितीय ३ हजार व प्रशस्तिपत्र आणि तृतीय २ हजार व प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. तसेच दोन स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रशस्तीपत्र दिले जाईल. सदर स्पर्धा हंसापूर येथील सातेरी सभागृहात होणार आहे. इच्छुकांनी निलेश (९४२१२५६१३९) किंवा गोविंद (९४२१२५७५०६) यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.