26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

स्व. विजयराव नाईक यांचा नववा स्मृतिदिन ; ३०० नागरिकांची नेत्रतपासणी व ६० जणांवर करण्यात आली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दिला, स्वर्गीय विजयराव नाईक यांच्या सामाजिक जाणिवांच्या आठवणींना उजाळा.

वडिलांच्या समाजकार्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न : आमदार वैभव नाईक.

कणकवली | प्रतिनिधी : स्वर्गीय विजयराव विष्णू नाईक यांचा नववा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, मुरलीधर नाईक आमदार वैभव नाईक व उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिना निमीत्त विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यामध्ये कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी कॅम्प आयोजित करून ३०० हुन अधीक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तर ६० जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर म्हणाले की, स्वर्गीय विजयराव नाईक यांनी विविध क्ष्रेत्रात केलेले समाजहिताचे काम आजही डोळ्यासमोर आहे. गरीब कुटुंबातील लोकांना मदतीचा हात देऊन अनेक लोकांचे संसार त्यांनी उभे केलेले होते. ५० वर्षांपूर्वी कणकवलीचा कायापालट करण्यात विजयराव नाईक यांनी मोठा हातभार लावला होता. समाजसेवेत ते कायम अग्रेसर असत विजयभाऊंचे समाजसेवेचे व्रत जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणार्‍या विजयराव नाईक यांच्या स्मृती आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात फार मोठ्या आदराची भावना आहे. वडिलांनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कामाचा वारसा जपण्याच्या प्रयत्न आम्ही करत आहोत असे सांगितले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,संकेत नाईक,राजवर्धन नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शेखर गावडे, संजय पारकर, सचिन आचरेकर,रुपेश आमडोस्कर, नागेश ओरोसकर, योगेश तावडे, भगवान परब, रोहित राणे, रवी कदम, अनंत पाटकर, युवक कल्याण संघाचे खजिनदार मंदार सावंत, फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य चंद्रशेखर बाबर आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!