मालवण | प्रतिनिधी : भंडारी एज्युकेशन सोसायटी ( मालवण ) मुंबई संचलित भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल मालवणचा दहावीचा निकाल ९८.२७ टक्के एवढा लागला असून. या प्रशालेचा कु. सम्राट बाबुराव राजे या विद्यार्थ्याने ५०० पैकी ४८१ गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला.
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत भरीव यश संपादन केले आहे. या प्रशाळेतून दहावीच्या परीक्षेस ५८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले तर एका विद्यार्थ्याला उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.
या परीक्षेत कु. लिनेश प्रेमानंद तारी याने ४५० गुण मिळवीत द्वितीय तर कु. पार्थ साईनाथ मेस्त्री याने ४४४ गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला. कु सर्वांगी आत्माराम हातणकर या विद्यार्थिनीने ४४३ गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनरारी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, भंडारी ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलचे मुख्याध्यापक हणमंत तिवले आणि संस्था चालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.