मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलचा एस एस सी परीक्षा २०२४ चा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेच्या कु. वैष्णवी खोत हिने ९५.६० % एकूण गुण मिळवत प्रथम क्रमांक, कु. शुभ्रा प्रभूगांवकर व कु. स्मित मयेकर यांनी प्रत्येकी ९३.६०% एकूण गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु. आर्या पाटील हिने ९१.६० एकूण गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेतून एस एस सी २०२४ साठी एकूण ६५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी संस्थेच्या वतीने विशेष प्रशंसा केली असून त्यांनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.