27.7 C
Mālvan
Saturday, July 27, 2024
IMG-20240531-WA0007

“राहुल घाडी…. नाम याद रहेगा..!”

- Advertisement -
- Advertisement -

फवारणी करताना झाडावरुन पडून जायबंदी होऊन देखील बारावीची परीक्षा देत यशस्वी झालेल्या राहुल घाडी याची ‘बडी’ गोष्ट….!’     

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या, मुणगे सडेवाडी येथील राहुल घाडी या बारावीच्या एका विद्यार्थ्याचे त्याने बारावीच्या परीक्षेसाठी दाखविलेल्या धैर्याबद्दल आता त्याची “राहुल…नाम तो सुना होगा” या वाक्या ऐवजी आता “राहुल घाडी…नाम याद रहेगा” अशी प्रशंसा करावी अशी गोष्ट त्याने केली आहे.

राहुलने आचरे केंद्रावर, त्याची बारावीची बोर्ड परीक्षा सुरू झाल्यावर सुरवातीचे दोन पेपर दिले होते. तिसरा पेपर चार दिवसानी असल्यामुळे वाडीतील आंब्याच्या झाडावर फवारणी करण्यासाठी तो चढला होता. सुमारे १५ फुटांपेक्षा जास्त उंचीवरील फांदीवर तो फवारणी करत असताना त्याने पाय ठेवलेली आंब्याच्या झाडाची फांदी तुटली आणि तो जमिनीवर आदळला. कातळ भाग असल्याने त्याचे दोन्ही हात व एक पाय जायबंदी झाले. त्याला अधिक उपचारासाठी कणकवलीला नेण्यात आले. डोके किंवा इतर कुठे मार न लागल्याने तत्काळ त्याला कणकवली येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार घेत असताना आपण उर्वरित पेपर न दिल्यास आपल्या कॉलेजच्या १००टक्के निकालाच्या परंपरेवर परिणाम होईल अशी एकच खंत त्याला लागून राहिली होती. त्यामुळे त्याने याबाबत कॉलेजच्या शिक्षकांशी संपर्क साधत पेपरला येणार असल्याचे सांगितले. दोन्ही हातांना प्लास्टर घातलेले असले तरी त्याची हाताची बोटे मोकळी असल्याने लिहिता येणे शक्य असल्याचे त्याने सांगितले. तिसऱ्या पेपर दिवशी सकाळी दवाखान्यातून डिस्चार्ज घेत त्याने थेट आचरे येथे परीक्षा केंद्र गाठले. उर्वरित चार पेपर त्याने अशाच स्थितीत दिले. यात त्याचा भाऊ व शिक्षक यांची त्याला मनोधैर्य वाढवणारी अशी सक्रीय साथ लाभली.

एच एस सी तथा बारावी २०२४ साठीच्या बोर्ड परीक्षेचे दोन पेपर देऊन झाल्या नंतर राहुल घाडी झाडा वरून खाली पडला. त्याचे दोन्ही हात जायबंदी झाले. त्याला प्लास्टर घातले गेले आणि पायांना सुद्धा जखमा झालेल्या सर्व ठिकाणी मुका मार लागला होता. अशाही अवस्थेत राहुलने प्रचंड आत्मविश्वास दाखवत उर्वरित ४ पेपर, परीक्षा केंद्रावर येत पूर्ण वेळ उत्तर पत्रिका सोडवत पूर्ण केले. त्याला ५४ % गुण देखील मिळाले.  

मुणगे ज्युनिअर कॉलेजचा हा विध्यार्थी, मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि  ज्यू कॉलेजमध्ये ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या ट्रेडचा बारावी मध्ये शिकला. राहुल हा कार्यशाळेत काम करताना प्रचंड उत्साही असा हा विद्यार्थी अशी त्याची प्रशाले मधील ओळख..! आता तोच राहुल त्याच्या काॅलेजचा निकाल १०० % लागावा म्हणून जायबंदी असूनही त्याच्या धैर्याची तंदुरुस्ती सिद्ध केलेला ‘जाणिवेचा राहुल घाडी’, असाच ओळखला जाईल अशी त्याची प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

फवारणी करताना झाडावरुन पडून जायबंदी होऊन देखील बारावीची परीक्षा देत यशस्वी झालेल्या राहुल घाडी याची 'बडी' गोष्ट….!'     

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या, मुणगे सडेवाडी येथील राहुल घाडी या बारावीच्या एका विद्यार्थ्याचे त्याने बारावीच्या परीक्षेसाठी दाखविलेल्या धैर्याबद्दल आता त्याची "राहुल…नाम तो सुना होगा" या वाक्या ऐवजी आता "राहुल घाडी…नाम याद रहेगा" अशी प्रशंसा करावी अशी गोष्ट त्याने केली आहे.

राहुलने आचरे केंद्रावर, त्याची बारावीची बोर्ड परीक्षा सुरू झाल्यावर सुरवातीचे दोन पेपर दिले होते. तिसरा पेपर चार दिवसानी असल्यामुळे वाडीतील आंब्याच्या झाडावर फवारणी करण्यासाठी तो चढला होता. सुमारे १५ फुटांपेक्षा जास्त उंचीवरील फांदीवर तो फवारणी करत असताना त्याने पाय ठेवलेली आंब्याच्या झाडाची फांदी तुटली आणि तो जमिनीवर आदळला. कातळ भाग असल्याने त्याचे दोन्ही हात व एक पाय जायबंदी झाले. त्याला अधिक उपचारासाठी कणकवलीला नेण्यात आले. डोके किंवा इतर कुठे मार न लागल्याने तत्काळ त्याला कणकवली येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार घेत असताना आपण उर्वरित पेपर न दिल्यास आपल्या कॉलेजच्या १००टक्के निकालाच्या परंपरेवर परिणाम होईल अशी एकच खंत त्याला लागून राहिली होती. त्यामुळे त्याने याबाबत कॉलेजच्या शिक्षकांशी संपर्क साधत पेपरला येणार असल्याचे सांगितले. दोन्ही हातांना प्लास्टर घातलेले असले तरी त्याची हाताची बोटे मोकळी असल्याने लिहिता येणे शक्य असल्याचे त्याने सांगितले. तिसऱ्या पेपर दिवशी सकाळी दवाखान्यातून डिस्चार्ज घेत त्याने थेट आचरे येथे परीक्षा केंद्र गाठले. उर्वरित चार पेपर त्याने अशाच स्थितीत दिले. यात त्याचा भाऊ व शिक्षक यांची त्याला मनोधैर्य वाढवणारी अशी सक्रीय साथ लाभली.

एच एस सी तथा बारावी २०२४ साठीच्या बोर्ड परीक्षेचे दोन पेपर देऊन झाल्या नंतर राहुल घाडी झाडा वरून खाली पडला. त्याचे दोन्ही हात जायबंदी झाले. त्याला प्लास्टर घातले गेले आणि पायांना सुद्धा जखमा झालेल्या सर्व ठिकाणी मुका मार लागला होता. अशाही अवस्थेत राहुलने प्रचंड आत्मविश्वास दाखवत उर्वरित ४ पेपर, परीक्षा केंद्रावर येत पूर्ण वेळ उत्तर पत्रिका सोडवत पूर्ण केले. त्याला ५४ % गुण देखील मिळाले.  

मुणगे ज्युनिअर कॉलेजचा हा विध्यार्थी, मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि  ज्यू कॉलेजमध्ये ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या ट्रेडचा बारावी मध्ये शिकला. राहुल हा कार्यशाळेत काम करताना प्रचंड उत्साही असा हा विद्यार्थी अशी त्याची प्रशाले मधील ओळख..! आता तोच राहुल त्याच्या काॅलेजचा निकाल १०० % लागावा म्हणून जायबंदी असूनही त्याच्या धैर्याची तंदुरुस्ती सिद्ध केलेला 'जाणिवेचा राहुल घाडी', असाच ओळखला जाईल अशी त्याची प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!