टेक्सास विद्यापीठातून इन्फाॅर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर सायन्स.
एआय मध्ये करीअर करण्यास उत्सुक सानिकावर सदिच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणची सुकन्या सानिका कांचन सुदेश आचरेकर हिने अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे. सानिका ही कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत आहे. तिला डेटा सायन्स, एआय मध्ये रूची असून त्या क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सानिका हिने सांगितले आहे.
एआय हा जागतिक बदल आहे. एआय अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सला तथा कृत्रिम बुद्धिमत्ता हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. संगणक प्रणाली माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करते. याच तंत्रज्ञानाद्वारे अनेक गोष्टी माणसापेक्षाही अधिक सहज करते. या क्षेत्रात सानिका आपले भविष्य पाहत आहे. सानिकाच्या यशस्वीतेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत व तिचे अभिनंदन होत आहे.
मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश आचरेकर व माजी नगरसेविका सौ. कांचन (स्नेहा) आचरेकर यांची सानिका ही सुकन्या होय. तिचे शालेय शिक्षण मालवण रोझरी इंग्लिश स्कूल येथे झाले तर ११, १२ वी डीजी रुपारेल कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग तिने विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उल्लेखनीय व यशस्वीरित्या पूर्ण केले.
डेटा सायन्स, एआय मध्येच स्वारस्य आहे म्हणून माहिती प्रणाली डेटा, एआय, व्यवस्थापनासाठी डेटा, एआय मॅनेजमेंटसाठी डेटा निवडतात. त्यानुसार लक्ष केंद्रित करून सानिका हिने इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली.
एआय बऱ्याच मॅन्युअल गोष्टी घेत आहे, प्रत्येक गोष्ट डेटा आहे, आपण जे काही बोलता ते आपल्या फोनद्वारे संग्रहित केले जाते. त्याला डेटा म्हणतात. या डेटाला साफसफाईची आणि व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. वाचण्यास सोपे तसेच वापरकर्ता साठी अनुकूल असे अहवाल प्रदान करणे हे माझे काम आहे. हे क्षेत्र भविष्य आहे. कालानुरूप जगात तंत्रज्ञान अधिक वेगाने वाढेल असे सानिका सांगते. वडिल हे माझी ढाल आहेत, त्यांनी प्रत्येक पावलावर नेहमीच खंबीरता, साथ दिली. सोबतच हा प्रवास आई शिवाय शक्यच नव्हता. कारण आईची दृष्टी असणे अत्यावश्यक आहे. माझ्या आईंची दूरदृष्टी, त्याग, समर्पण आणि अखंड मार्गदर्शन यामुळे मला या प्रवासात मदत झाली. भाऊ ओमने मला संयम आणि प्रत्येक परिस्थितीत शांत कसे राहायचे हे शिकवले. शाळेने मला खूप काही शिकवले आहे आणि मला एक चांगली व्यक्ती बनवले. माझे सर्व शिक्षक यांचे मिळालेले मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वाचे ठरले आहे. हे केवळ माझेच यश नाही तर प्रत्येक मालवणकराचे यश आहे. कष्ट करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका असेही सानिका हिने सांगितले आहे.